भगवान राम, कृष्ण यांना राष्ट्रीय
सन्मान देण्यासाठी कायदा करा
राम जन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीवेळी “या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या ह्रदयात भगवान राम वास्तव्य करतात”, अशी टिप्पणी करणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका नव्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आता थेट संसदेत कायदा पारित करण्याची मागणी केली आहे. “भगवान राम, भगवान कृष्ण हे देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना राष्ट्रीय सन्मान देण्यासाठी संसदेमध्ये कायदा करावा”, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवलं आहे. न्यायालयाच्या या भूमिकेवर तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
पंतप्रधान मोदींचे आयुष्य
सार्वजनिक : अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला रविवारी विशेष मुलाखत दिली. पंतप्रधान मोदींना सत्तेत २० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी ही मुलाखत दिली आहे. पंतप्रधान मोदींचे आयुष्य सार्वजनिक आहे. पंतप्रधान मोदींना प्रशासनाचे बारकावे समजले आहेत.
अमित शाह यांनी भाष्य केले आहे. ते जोखीम पत्करुन निर्णय घेतात हे बरोबर आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की, आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. १३० कोटी भारतीयांना जगातल्या सर्वात सन्मानजनक जागी पोहोचवाचे आहे. जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे नसता गेला जर हे निर्णय झाले असते. पण ते आता होत आहे,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
एक्स्प्रेस वे वरील वाहनांची
वेगमर्यादा 140 किलोमीटर प्रतितास होणार
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, ते एक्स्प्रेस वे वरील वाहनांच्या वेग मर्यादेत वाढ करून ती १४० किलोमीटर प्रतितास करण्याच्या बाजूने आहेत. तसेच, यासंबंधी लवकरच संसदेत विधेयक देखील सादर केले जाणार आहे. त्यांनी सांगितले की विधेयकाचा उद्देश विविध श्रेणींमधील मार्गांवरील वाहनांच्या वेग मर्यादेत बदल करणे आहे.
भाजपा मुख्यालयात थेट केंद्रीय
मंत्र्यांशी संवाद साधता येणार
भारतीय जनता पार्टीने एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारपासून आता पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांना भाजपा मुख्यालयात थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याचं पक्षाने जाहीर केलं आहे. येत्या सोमवारपासून पक्षाच्या मुख्यालयात पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी सहकार विभाग सुरू होत आहे. करोना महामारीमुळे काही काळ हा विभाग कार्यरत नव्हता. सोमवारपासून सर्व केंद्रीय मंत्री वेळापत्रकाप्रमाणे भाजपा मुख्यालयात उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपा सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री सिंधुदुर्गातून परताच निलेश राणेंनी दिला धक्का, सेनेचे 3 सदस्य भाजपात!
सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या श्रेय वादानंतर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा सामना पहायला मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौऱ्याला 24 तास होत नाहीत. तेच माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला झटका दिला आहे. कुडाळ पंचायत समितीचे शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
माजी पंचयात समिती सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निलेश राणे यांचे कट्टर समर्थक विशाल परब व दादा साईल यांचा या प्रवेशात मोठा हात आहे.
जळगावात गिरीश महाजनांचा शिवसेनेला जबरदस्त धक्का, भाजपच्या बंडखोर नगरसेवकांची घरवापसी
राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात संघर्ष सुरुच आहे. त्यातच जळगाव मध्येही दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वावरुन जोरदार चढाओढ सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी जळगावमध्ये शिवसेनेनं भाजपला धक्का देत महापालिकेच्या सत्तेतून बाहेर केलं. त्यावेळी भाजपच्या 30 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. या 30 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. मात्र आता काही महिने उलटल्यावर भाजपनंही शिवसेनेवर पलटवार केला आहे. या 30 बंडखोर नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे.
आज भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. सुरेश सोनावणे, शोभा बारी आणि हसिना बी. शेख या नगरसेवकांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी केली.
किल्ले प्रतापगड ३६२ मशालींनी
उजळून निघाला
छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगड ३६२ मशालींनी उजळून निघाला. निमित्त होते ते प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३६१ वर्षे पूर्ण झाल्याचे. नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील प्रतापगड,महाबळेश्वर,सातारा,पुणे,कोल्हापूर,सांगली आदी विविध भागांमधून हजारो भाविकांनी तरुणांनी प्रतापगडावर हजेरी लावली.
देवीच्या दर्शनासाठी कार्ला
गडावर भाविकांची तुडुंब गर्दी
राज्यात घटनस्थापनेचा मुहूर्त साधून मंदिरे खुली करण्यात आली. मात्र, ऐन नवरात्रोत्सवात ही मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर भाविकांनी तुडुंब गर्दी केली असून नागरिकांना करोनाचा विसर पडला आहे की काय ?असा प्रश्न निर्माण होत आहे. कार्ला येथील एकविरा देवी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत आहे.
मुंबईत पहिल्यांदाच
डिझेलची किंमत १०० च्या पुढे
देशातल्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सामान्यांवर अधिकच बोजा टाकत आहेत. वाढत्या किंमतींमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या वर गेल्या आहेत. खाद्यपदार्थांपासून ते पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरपर्यंत किमती वाढतच जात आहेत. तेल कंपन्यांनी रविवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. तर मुंबईत पहिल्यांदाच डिझेलची किंमत १०० च्या पुढे गेली आहे.
CS फाउंडेशनची परीक्षा
3 आणि 4 जानेवारीला होणार
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने ICSI CS फाउंडेशन परीक्षा 2021 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. डिसेंबर टर्मची परीक्षा 3 आणि 4 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत ते ICSI च्या अधिकृत वेबसाईट icsi.edu ला भेट देऊन नोटीस तपासू शकतात. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 11, दुसरी शिफ्ट दुपारी 12 ते 1.30, तिसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते दुपारी 4 आणि चौथी शिफ्ट संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत. पेपर 1 आणि पेपर 2 पहिल्या दिवशी आणि पेपर 3 आणि पेपर 4 दुसऱ्या दिवशी घेण्यात येतील.
लेबनान देश अंधारात बुडाला,
अनेक दिवस वीज पुरवठा नाहीच
सध्या संपूर्ण जगासमोर एक मोठे उर्जा संकट घोंघावत आहे. चीनपासून सुरू झालेले हे संकट जर्मनीनंतर आता लेबनॉनपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत भारतालाही वीज कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 6 दशलक्ष लोकसंख्या असलेला लेबनान हा संपूर्ण देश अंधारात बुडाला आहे. पुढील काही दिवस वीजपुरवठा सुरूच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इंधनाअभावी देशातील दोन मोठे वीज प्रकल्प बंद झाले आहेत.
SD social media
9850 60 3590