इंडिगो विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने खळबळ, पाटणा विमानतळावर गोंधळ

पाटणा येथून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाटण्याच्या विमानतळावर दिल्लीच्या दिशेला उड्डाण घेणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात अचानक बॉम्ब असल्याची बातमी पसरली. त्यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. विमानात असलेल्या प्रवाशांपैकीच एकजण आपण सोबत बॉम्ब घेऊन आल्याचं विधान केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित बातमी वाऱ्यासारखी विमानतळाच्या प्रशासकीय अधिकऱ्यांपर्यंत पोहोचली. तातडीने सूत्रे हलली आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विमान खाली करण्यात आलं. घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं आहे. या पथकाकडून बॉम्ब शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पण या पथकाला अद्याप संशयास्पद असं काहीही सापडलेलं नाही.

पाटणाहून दिल्लीच्या दिशेला जाणाऱ्या इंडिगो 2126 च्या फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्यानंतर तातडीने प्लेन खाली करण्यात आलं. घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला बोलावण्यात आलं आहे. पथक घटनास्थळी दाखल झालं असून तपास सुरु आहे. पण अजूनपर्यंत कोणतीही संशयित वस्तू सापडल्याची माहिची मिळालेली नाही. याबाबतची माहिती पाटणाचे एसएसपी मानवजीत सिंह यांनी दिली आहे.

खरंतर, विमानात आलेल्या एका प्रवाशाने आपल्याकडे बॉम्ब असल्याचा दावा केला. त्यानंतर तातडीने प्रवाशांना प्लेनमधून खाली उतरवण्यात आलं. या विमानात एकूण 134 प्रवासी होते. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्येष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी चौकशीसाठी पोहोचले आहेत. सर्व प्रवाशांची चौकशी केली जात आहे. तसेच बॉम्ब नाशक पथकदेखील बारकाईने विमानाची झडती घेत आहे.

पूर्ण चौकशी आणि तपासानंतरच विमान टेक ऑफ करेल. या विमानात 134 प्रवासी होते. या विमानाला रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दिल्लीसाठी उड्डाण घ्यायची होती, अशी माहिती पाटण्याचे एसएसपी मानजीत सिंह यांनी दिली. दरम्यान, बॉम्बबाबत ज्याने विधान केलं किंवा तशी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला त्याला ताब्यात घेतलं का याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.