कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देश अलर्टवर आहे. पण संपूर्ण देशाला काळजीत टाकणारे अहवाल पुन्हा प्राप्त झालेत. जे दोन ओमिक्रॉन पेशंट आहेत त्यातल्या एकाच्या संपर्कातले 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचही टेन्शन वाढलं आहे. कारण कर्नाटक हा महाराष्ट्राचा शेजारी आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे बंगळुरूमध्ये जे दोन ओमिक्रॉनची लागण झालेले पेशंट सापडलेत, त्यातल्या एकानं कुठेही विदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळेच त्याला ओमिक्रॉनची लागण कुठून झाली हा मोठा सवाल आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूत हे दोन्ही ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण सापडलेले आहेत. त्यातला एक जण हा दक्षिण आफ्रिकेचा नागरीक आहे. त्याचं वय 66 वर्षे इतकं आहे. गेल्या महिन्यात तो दुबई मार्गे बंगळुरुत पोहोचलाय. तर दुसरा रुग्ण हा एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये काम करणारा 46 वर्षीय डॉक्टर आहे. विशेष म्हणजे डॉक्टरची कुठलीही प्रवासाची हिस्ट्रि नाही. म्हणजेच डॉक्टरनं कुठेही प्रवास केला नसेल तर त्याला ओमिक्रॉनची लागण झाली कुठून हा मोठा सवाल आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
दोघांनाही ओमिक्रॉनचे माईल्ड सिम्पटम्पस (Omicron Symptoms) आहेत. ज्याला कुठेही प्रवास न करता ओमिक्रॉनची लागण झाली म्हणजेच बंगळुरुत इतरांना पण ओमिक्रॉनची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याची संख्या किती असेल वगैरे याचा प्राथमिक अभ्यास केला जातोय. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आरोग्य अधिकारी-डॉ. सी. नागराज म्हणाले की, ज्या रुग्णानं कुठेही प्रवास केल्याची नोंद नाही, त्याला जर ओमिक्रॉनची लागण झालेली असेल तर मग कम्युनिटी स्प्रेड चेक करावा लागेल.
दरम्यान, फरारी घोषित करण्याचा आदेश रद्द करण्यासाठी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांच्या कोर्टासमोर आज सुनावणी झाली. मात्र पुढील सुनावणी उद्या ठेवण्यात आली आहे. सिंग यांना संरक्षण देण्यात आलं आहे. तसेच ते तपास अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करणार असल्याचंही कोर्टाने नमूद केलं आहे. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आल्याचा आदेश रद्द करण्यात यावा, असा युक्तिवाद सिंग यांची वकील अरबी मोकाशी यांनी केला आहे. तर, सह आयुक्त विनय सिंह यांना फरार घोषित करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. त्याचा अहवाल अजून आला नसल्याचं सांगत या प्रकरणी उद्या सुनावणी ठेवण्याची विनंती विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी केलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे.