ज्ञानवापी काशी विश्वनाथप्रकरणी सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी खंडपीठाची स्थापना करणार आहे. हिंदूवादी संघटनेच्या वतीने वकील विष्णू शंकर जैन यांनी गुरुवारी याप्रकरणी तातडीने सुनावणीची मागणी केली होती. यानंतर मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी करण्याचे स्पष्ट केले.
मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने गुरुवारी काही हिंदू भाविकांच्या वतीने विष्णू शंकर जैन यांनी मांडलेली बाजू समजून घेतली आणि त्यानंतर सुरक्षा देण्याचा आदेश १२ नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे. मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की, उद्या दुपारी ३ वाजता एका पीठाची स्थापना करणार आहोत. हिंदू पक्षाने ज्ञानवापी परिसरातील तळघराचे कुलूप उघडून पाहणी करण्याची मागणी केली होती. दाव्यानुसार त्या ठिकाणी ‘शिविलग’ मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी एक आदेश देत वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ज्ञानवापी-श्रृंगार गौरी परिसराच्या अंतर्गत सुरक्षेचे निर्देश दिले होते.