बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण अभिनेत्रीने तिच्या अभिनयाच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख बनवली आहे. अनेक सुपरहिट चित्रपट देत दीपिकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अशातच दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या अभिनयामुळे नाही तर दुसऱ्या एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरतेय.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने इंडस्ट्रीत 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास प्रसंगी, अभिनेत्रीने तिचा सेल्फ केअर ब्रँड लॉन्च केला आहे, ज्याचे नाव आहे 82 East. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दीपिकाने याबाबत माहिती दिली आहे. दीपिकाने याविषयी तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत दीपिकाने लिहिले ‘दोन वर्षांपूर्वी आम्ही एक आधुनिक सेल्फ केअर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्याचा उगम भारतातून होईल आणि संपूर्ण जगापर्यंत पोहचेल’.
ब्रँडच्या नावाबद्दल बोलताना दीपिका म्हणाली ‘याला 82 ईस्ट म्हणतात. आमचा ब्रँड स्टँडर्ड मेरिडियनपासून प्रेरित आहे, जो भारताला जगाशी जोडतो. हा ब्रँड लाँच करण्याचा उद्देश प्रत्येकासाठी स्वत: ची काळजी सुलभ आणि मनोरंजक बनवणे आहे. व्यवसाय सुरू करण्याचा आतापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खूपच रोमांचंक होता. मी तुमच्यासोबत हे शेअर करायला खूप उत्सुक आहे’.दीपिकाचा हा पहिला व्यवसाय नाही, याआधी अभिनेत्रीने स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती, ज्याचे नाव तिने केए प्रॉडक्शन ठेवले होते. आत्तापर्यंत या बॅनरखाली ‘छपाक’ हा चित्रपट बनला आहे.
दरम्यान, दीपिका पादुकोणचे अनेक मोठे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ती शाहरुख खानसोबत ‘पठाण’मध्ये स्क्रीन शेअर करत आहे. याशिवाय ती तिच्या पुढच्या प्रोजेक्टची शूटिंग करत आहे ज्यात प्रभास आणि अमिताभ बच्चन देखील आहेत. ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दीपिका दिसणार आहे.