टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पुन्हा हाराकिरी, पराभवाची 5 कारणं

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 169 रनचं आव्हान इंग्लंडने 16 ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पार केलं. एलेक्स हेल्सने नाबाद 86 आणि जॉस बटलरने नाबाद 80 रन केले. टीम इंडियाच्या या मानहानीकारक पराभवासाठी बॅटिंग आणि बॉलिंग आणि टीम सिलेक्शनही कारणीभूत ठरलं.

भारताच्या पराभवाची कारणं

रोहित-राहुलचा फ्लॉप शो

टी-20 वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात टीम इंडियाच्या ओपनरना धडाकेबाज सुरूवात करण्यात अपयश आलं. रोहित शर्माने स्पर्धेत एक अर्धशतक तर केएल राहुलने दोन अर्धशतकं केली, पण दोन्ही खेळाडूंनी सुरूवातीला संथ बॅटिंग केली. केएल राहुलने झिम्बाब्वे आणि बांगलादेशविरुद्ध अर्धशतकं केली, पण पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध केएल राहुलला दोन अंकी स्कोअरही करता आला नाही.

अक्षर पटेल टीममध्ये का?

रवींद्र जडेजाला दुखापत झाल्यानंतर टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपसाठी अक्सर पटेलची निवड केली, पण संपूर्ण स्पर्धेत अक्षर पटेल अपयशी ठरला. अक्षरला बॅटिंगमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही, तर बॉलिंगमध्ये विरोधी टीम त्याच्या बॉलिंगवर तुटून पडल्या. ग्रुप स्टेजमध्ये अक्सर अपयशी ठरत असताना सेमी फायनलमध्ये त्याला खेळवण्याचा अट्टाहास का करण्यात आला? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

अश्विन ठरला अपयशी

लेग स्पिनर असलेल्या युझवेंद्र चहलची टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झाली, पण त्याला एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्याऐवजी रोहितने आर.अश्विनला प्रत्येक सामन्यात खेळवलं, पण अश्विनही काही खास करू शकला नाही.

पंत-कार्तिकचं कनफ्यूजन

सुरूवातीच्या सामन्यांमध्ये टीम इंडियाने ऋषभ पंतला न खेळवता दिनेश कार्तिकला संधी दिली. दिनेश कार्तिककडे टीम इंडिया फिनिशर म्हणून पाहत होती, पण त्यालाही फिनिशरची भूमिका पार पाडता आली नाही, त्यामुळे टीमने कार्तिकला बाहेर करून ऋषभ पंतला खेळवलं.

नॉकआऊटच्या प्रेशरमध्ये पुन्हा फेल

टीम इंडियाने नॉकआऊट सामन्यात पुन्हा एकदा पराभवाची पुनरावृत्ती केली आहे. 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2014 टी-20 वर्ल्ड कप फायनल, 2015 वनडे वर्ल्ड कप सेमी फायनल, 2016 टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनल, 2019 टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि आता 2022 टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनल या स्पर्धांमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नॉकआऊटचा दबाव टीम इंडियाला झेलता आला नाही का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.