हिरो होंडावर आयकर विभागाची धाड, 1000 कोटी रुपयांचे बनावट पेमेंटचा संशय

हिरो होंडा ही दुचाकी वाहन निर्मिती करणारी एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत देशवासीयांच्या हृदयावर राज्य मिळवले आहे. या कंपनीने बाजारामध्ये आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टू-व्हीलर्सची निर्मिती केली आहे परंतु हल्ली ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कंपनीवर आयकर विभागाची धाड पडली आहे.

या छापेमारीत अनेक गोष्टींचा उलगडा होईल असे देखील सांगण्यात येत आहे. आयकर विभाग ने हीरो मोटोकॉर्प वर टाकलेल्या छापेमारी संदर्भात मंगळवारी एक मोठा खुलासा केला. कंपनी ने केलेल्या 1000 कोटी रुपयांच्या व्यवहार खर्चावर आम्ही विश्लेषण करत आहोत. या व्यवहारातील कागदपत्र बनावट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, असे आयकर विभागाने आपल्या निवेदनात म्हंटले. सूत्रांच्या माहितीनुसार आयकर विभाग कंपनीच्या तपासणी साठी डिजीटल डेटा आणि अन्य कागदपत्रांची शोध तपासणी करत आहे.

फार्महाउसची देखील केली जाणार आहे तपासणी
आयकर विभाग दिल्ली बाहेरील परिसरामध्ये असलेल्या फार्महाउसची देखील तपासणी करणार आहे. हा व्यवहार करताना बनावट पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. हा व्यवहार करताना 1000 कोटी रुपयांचे बनावट पेमेंट केले गेले होते.

छापेमारी नंतर BSE हीरो मोटोकॉर्प चे शेअर 6.68 टक्क्याने घसरले आणि हे शेअर 2,219 रुपयाच्या स्तरावर पोहचून बंद झाला. दिवस भराच्या कामकाज दरम्यान कंपनीचे स्टॉक 2,154 ने गडाडले.

आयकर विभागाने या महिन्यात पवन मुंजाल सोबत हीरो मोटोकॉर्प चे प्रमोटर्स ऑफिस आणि घरावर देखील छापेमारी टाकली. याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आले आणि पंचनामा देखील करण्यात आला.

हीरो मोटो कॉर्प हि प्रसिद्ध कंपनी आहे.या कंपनीच्या उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते 2001 मध्ये दुचाकी बनवणारी जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून या कंपनीने ओळख मिळवली. कंपनीने आतापर्यंत गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. कंपनीचे हल्ली आशिया आफ्रिका साउथ आणि सेंट्रल अमेरिका समवेत 40 देशांमध्ये आपले साम्राज्य पसरलेले आहे.घरगुती बाजारामध्ये 50 टक्क्या पेक्षा जास्त बाजाराची हिस्सेदारी आहे. ही कंपनी दुचाकी वाहन क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.