आरआरआर चित्रपटाची कमाई 490 कोटी रुपये

एस. एस. राजामौली यांचा सुपर-डुपर हिट सिनेमा आरआरआर बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवतोय. कालही या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 19 कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे. तर RRR या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे.

या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत. रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची जगभरातील कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. यावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आरआरआर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवतोय.

यावर सलमान खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी चिरंजीवी यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. त्यांचा मुलगा रामचरणही माझा मित्र आहे. रामचरणने RRR सिनेमात खूप दमदार काम केलं आहे. या सिनेमाला एवढं यश मिळतंय, याचा मला आनंद आहे.”, असं सलमान म्हणाला आहे.

आरआरआर या सिनेमाने पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 19 कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे.

RRRची जगभरात क्रेझ आहे. जगभरात रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये RRRचा समावेश झाला आहे. राजामौलींच्या या बिग बजेट चित्रपटाने जरी 500 कोटींपर्यंत गल्ला जमवला असला तरी ‘बाहुबली: द कन्क्लुजन’चा पहिल्या वीकेंडचा विक्रम अबाधित राहिला. बाहुबली 2 ने पहिल्या वीकेंडमध्ये 526 कोटी रुपये कमावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.