आय ए एस टीना डाबी पुन्हा एकदा लग्न करतायत

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांचे दुसरे लग्न. होय, टीना डाबी पुन्हा एकदा लग्न करतायत. 22 एप्रिल रोजी जयपूर येथे मोठ्या धूमधडाक्यात त्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करून दिलीय.

यापूर्वी टीना डाबी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2015 च्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या अतहर खान यांच्याशी लग्न केले होते. ते दोघे आएएसच्या प्रशिक्षणाच्या काळातच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे दोघांनाही राजस्थान केडर मिळाले होते. त्याचे 2018 मध्ये लग्न झाले.

अतहर मूळचे काश्मीरचे आहेत. मात्र, हे नाते टिकवण्यात टीना आणि अतहर अयशस्वी ठरले. त्यानंतर दोन वर्षांतच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता टीना यांनी जीवनसाथी म्हणून 2013 च्या बॅचचे आएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांची निवड केलीय. जाणून घेऊयात कोण आहेत, हे प्रदीप गावंडे.

प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रचे. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1980 रोजी झालाय. त्यांनी औरंगाबादमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा यूपीएससीकडे वळवला. त्यांनी 2013 मध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. ते टीना डाबी यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. यापूर्वी 2020 मध्ये ते चुरू येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र, सध्या ते राजस्थान येथील राजस्थान पुरातत्व आणि संग्रहालय विभागामध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे गावंडे यापूर्वी एका लाचप्रकरणामुळे चर्चेत आले होते.

टीना डाबी या स्वतः यूपीएससी टॉपर आहेत. विशेष म्हणजे त्यांची लहान बहीण रिया डाबी या सुद्धा आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 2020 मध्ये यूपीएससी परीक्षेत 15 वा रँक मिळवला आहे. या यशानंतर आपल्या लहान बहिणीने आपला मान वाढवलाय. रियाने मिळवलेल्या यशाने मला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया टीना यांनी दिली होती. टीना आणि प्रदीप यांनी आपल्या लग्नाची घोषणा केलीय. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत.

यूपीएससी परीक्षेसाठी मोफत कोचिंग विषयी जाणून घ्या : https://upscgoal.com/ias-free-coaching-in-hindi/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.