बॉलिवूड कलाकरांमध्ये सतत स्पर्धा सुरु असते. यामध्ये कोण वरचढ ठरतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रेक्षक व्हॅल्यूएशन सेलिब्रेटी कोण ठरलं हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. नुकतंच 2021 चा सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये डफ अँड फेल्प्सने व्हॅल्यू सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत टॉप 10 मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोण या भारतीय सेलिब्रिटींचा समावेश आहे. ही यादी डफ अँड फेल्प्सने ‘सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन स्टडी, 2021’ च्या ‘डिजिटल एक्सलेरेशन 2.0’ या नावाने आपल्या 7 व्या आवृत्तीत प्रसिद्ध केली आहे. रिपोर्टनुसार, आलिया भट्ट ही 2021 मधील सर्वात महागडी सेलिब्रिटी आहे. तिचं व्हॅल्युएशन अंदाजे 68.1 मिलियन असल्याचं म्हटलं जात आहे.
डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशनच्या रिपोर्टनुसार, आलिया भट्ट 2021 मध्ये सर्वात महागडी महिला सेलिब्रिटी म्हणून समोर आली आहे. 68.1 मिलियन व्हॅल्युएशनसह, आलिया भट्ट चक्क चौथ्या क्रमांकावर आहे आणि भारतीय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. मागील यादीच्या तुलनेत आलियाने दोन क्रमांकांची वाढ केली आहे. आलिया ही बॉलिवूडची सर्वात व्यस्त अभिनेत्री आहे आणि अनेक ब्रँड एंडोर्समेंटमुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.