लाल परी सुसाट वेगानं येत देणार जॉब्स; 10वी पाससाठी बंपर ओपनिंग्स

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC सोलापूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर, वेल्डर, पेंटर). या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

शिकाऊ उमेदवार

पदवीधर अभियांत्रिकी (Graduate Engineering)

मेकॅनिक मोटर व्हेईकल (Mechanic Motor Vehicle)

मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर (Motor Vehicle Bodybuilder)

वेल्डर (Welder)

पेंटर (Painter)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पदवीधर अभियांत्रिकी (Graduate Engineering) – उमेदवारांनी मॅक्नीकल इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मेकॅनिक मोटर व्हेईकल (Mechanic Motor Vehicle) – S.S.C. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 02 वर्ष I.E. शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून. टी. आय. मोटर मेकॅनिक व्हेईकल कोर्स पूर्ण आणि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर (Motor Vehicle Bodybuilder) – एस.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 01 वर्षाचे उत्पन्न. टी. आय. शीट मेटल वर्क कोर्स पूर्ण करणे आणि पास करणे आवश्यक आहे.

वेल्डर (Welder) – एस.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 01 वर्षाचे उत्पन्न. टी. आय.वेल्डर कोर्स पूर्ण करणे आणि पास करणे आवश्यक आहे.

पेंटर (Painter) – एस.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 01 वर्षाचे उत्पन्न. टी. आय. पेंटर कोर्स पूर्ण करणे आणि पास करणे आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/  या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.