कॅरेबियन स्फोटक फलंदाज ख्रिस गेल पुन्हा एकदा आयपीएलच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. पोस्ट शेअर करत त्याने आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
मागीलवर्षी पंजाब संघाला धक्का देत ख्रिस गेल याने संपूर्ण आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आता आयपीएल सीझन 15 खेळवण्यात येत आहे. अशातच गेलने पोस्ट करत आयपीएलच्या मैदानात पुन्हा उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत.
गेलनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तो वर्कआऊट करताना दिसत आहे. वर्कआऊट दरम्यान मिरर सेल्फी घेत एक स्टोरी अपलोड केली आणि ‘वर्क आत्ताच सुरु झाले आहे. आयपीएलच्या पुढील वर्षाची तयारी’ असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.