राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केली आहे. “Who is आदित्य ठाकरे? गोधडीत पण नव्हता. आम्ही तेव्हाही शिवसेनेत होतो. याला काय अधिकार आमच्यावर टीका करण्याचा?”, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला. जळगावातील कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत आज भाषणातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाषणातून निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
यावल तालुक्यातील न्हावी येथे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, लोकनियुक्त सरपंच भारती नितीन चौधरी, उपसरपंच उमेश बेंडाळे, माझी पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी यांच्या पाठपुरावाने गावासाठी ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.