देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक इंडियाकडून (SBI) ग्राहकांसाठी एक महत्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगसह डिजिटल सेवा दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येतील. ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी बँकेकडून सिस्टीम अपग्रेडेशन सुरु आहे. त्यासाठी उद्या दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत इंटरनेट बँकिंगची सुविधा बंद राहील.
त्यामुळे SBIच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगच्य माध्यमातून महत्वाचे व्यवहार करायचे असल्यास ती कामे आजच आटपून घेणे गरजेचे आहे. सिस्टीम अपग्रेडशनच्या काळात इंटरनेट बँकिंग, योनो अॅप (YONO App), योनो लाइट (YONO Lite) आणि यूपीआय (UPI) लाईट या सर्व सुविधा बंद असतील.
देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेत मोठे धोरणात्मक बदल होणार आहेत. याचा प्रभाव HDFC बँकेचे ग्राहक आणि संबंधित गोष्टींवर पडणार आहे. बँकेची धोरणे आणि रचनात्मक बदलांसह क्रेडिट कार्डांमध्येही मोठे बदल होणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाला अनुकूल अशी क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्याचा विचार एचडीएफसी बँक करत आहे. त्यासाठी क्रेडिट कार्ड विभागाचा कारभार फिनटेक या कंपनीकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डाच्या एन्ड टू एन्ड सुरक्षेत वाढ होणार आहे. सध्याच्या घडीला फिनटेक हे ऑनलाईन बँकिंग आणि क्रेडिट कार्डासाठी चांगले व्यासपीठ मानले जाते. त्यामुळेच एचडीएफसी बँकेकडून त्यांच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते.