तेव्हाच महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी होती – बच्चू कडू
आपण महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी देणार असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. यावरून आता शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना काहीच जमत नाही म्हणून त्यांनी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. तेव्हाच महिलेला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, ते तुमच्यासाठी बरं राहिलं असतं, अशी टीका बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
आत्मक्लेशपेक्षा छत्रपतींचे महत्त्व अधोरेखित करण्याला माझे प्राधान्य, अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीला घरचा बाहेर?
पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी काल सकाळपासून आमदार रोहित पवार आत्मक्लेशसाठी उपस्थित होते. स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. मात्र यात स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे मात्र दिसत नव्हते. यानंतर पुन्हा एकदा अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा रंगली. मात्र, यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट म्हणजे रोहित पवारांना चिमटा आहे का, अशी चर्चा होत आहे.आत्मक्लेशपेक्षा ठसा उमटवण्याला आणि छत्रपतींचे महत्व अधोरेखित करण्याला माझे प्राधान्य! असल्याचे म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी सोशल मिडियावर पोस्ट करत आमदार रोहित पवारांना घरचा आहेर देत चिमटा काढला आहे. काल वढू तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही, असा खुलासाही खासदार अमोल कोल्हेंनी केला.
लावणी कलाकार झाली थेट PSI
महाराष्ट्रातील लावणी हा प्रकार देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. लावणीला महाराष्ट्राच्या कला संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, लावणी कलाकार कधी महिला कधी पोलीस अधिकारी झाल्याचे तुम्ही ऐकले नसेल. मात्र, एका तरुणीने हा थक्क करणारा प्रवास पूर्ण करून दाखवलाय. पोलीस अधिकारी सुरेखा कोरडे यांनी हे शक्य करुन दाखवलंय.सुरेखा कोरडे यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येच आपलं करिअर करावे, असे त्यांना वाटायचे. मात्र, त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे सातवीत असतानाच आईसोबत धुणीभांडी करायला त्या जाऊ लागल्या. नृत्याची प्रचंड आवड असल्याने दहावीनंतर त्या छोट्या- मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायच्या. मात्र, परिवारातून त्यांना विरेध होता. मात्र, तरीसुद्धा त्यांनी लावणी कलाकार ते पोलीस अधिकारी यशस्वी प्रवास शक्य करुन दाखवला.
दीड लाख द्या, लग्न लावून देतो, औरंगाबादेत फेक नवरी मंडळाचा पर्दाफाश
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या घटनेने औरंगाबाद शहर हादरले होते. दरम्यान ही घटना ताजी असताना दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट लग्न करून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर बनावट लग्न करुन लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट लग्न करून लुटायचे नवरदेवांना लुटल्याचा प्रकार समोर आला होता.बनावट लग्न लावून फसवणुकीचे गुन्हे हे पैठण तालुक्यात वाढले आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी काल एका लग्नाच्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता मुलाच्या घरच्यांना आरोपीने आमच्याकडे मुलगी आहे, तिला आई-वडील नाही. तिला लग्न लावून देण्यासाठी दीड लाख रुपये द्या, आम्ही तुमच्या मुलाचे लग्न करून देतो, असे सांगितले. यानंतर 18 ते 20 हजार रुपयांची खरेदी करून लग्नाचे सोंग मांडले होते.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन विरोधात गुन्हा दाखल
अर्जुन पुरस्कार विजेता आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता शटलर लक्ष्य सेनवर वय चोरून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. माध्यमातील माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध बेंगळुरूमध्ये एफआयआरही नोंदवण्यात आली आहे. वृत्तानुसार, लक्ष्य सेनवर कनिष्ठ स्तरावर स्पर्धा करताना वय-प्रतिबंधित स्पर्धांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी त्याच्या वयाची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
झी मराठीवरील ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकदा सुरु झालेला हा कार्यक्रम आता लवकरच गाशा गुंडणार असल्याची माहिती समोर येत आहे. कॉमेडीचा नवीन तडका असलेला ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात अनेक कलाकार सहभागी झाले होते. मात्र हा कार्यक्रम टीआरपीमध्ये मागे पडत असल्याने लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे.झी मराठीवरील फू बाई फू या कार्यक्रमाचे पहिले पर्व चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता या कार्यक्रमाचे दुसरे पर्व तब्बल ९ वर्षांनी सुरु झाले. यामुळे प्रेक्षक हे फार आनंदात होते. मात्र आता हा कार्यक्रम लवकरच अर्ध्यावरच गुंडाळला जात असल्याची माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमाला हवा तसा टीआरपी मिळत नसल्याने हा कार्यक्रम लवकरच बंद होणार असल्याचे बोललं जात आहे.
जुळ्या बहिणींशी विवाह करणं पडलं महाग; दुसऱ्याच दिवशी नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल
दोन दिवसांपूर्वीच अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह होता. या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असताना त्यांच्या आनंदावर आता विरजण पडण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे जुळ्या बहिणींशी विवाह करणाऱ्या अतुल अवताडेंविरोधात अकलूजमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, याप्रकरणी अतुलविरोधात भादंविच्या कलम ४९४ अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अकलूजचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशमुख यांनी दिली आहे.
मतदान यादीतून अनेक नावं गायब…; ‘आप’ करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार!
दिल्ली महापालिकेतील (एमसीडी) २५० वॉर्डांचे सदस्य निवडण्यासाठी आज (४ डिसेंबर) मतदान सुरू आहे. यादरम्यान मतदान यादीत अनेक नावे न आढळल्याने आम आदमी पार्टीने हे षडयंत्र म्हटल्याचा आरोप केला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले की, अनेक नावे मतदान यादीत नाहीत. मतदान केंद्राबाहेर लोकांनी मतदान यादीत नाव नसल्याची तक्रार केली आहे. मतदान यादीत नाव नसल्याने लोक नाराज आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.
SD Social Media
9850 60 3590