दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातलेली नाही : आरबीआय

रिझर्व बँक ऑफ इंडियानं (RBI)काल म्हणजेच गुरुवारी वार्षिक रिपोर्ट सादर केला. ह्या रिपोर्टमध्ये आरबीआयनं कोणते नाणे आणि नोटा किती चलनात आहेत याची माहिती दिली आहे. एवढच नाही तर किती नोटा आणि नाणे जारी केले जातात तेही आरबीआयनं सांगितलं. विशेष म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटेवर बंदी घातली नसल्याचही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसापासून दोन हजार रुपयाची नोट बंद केल्याची अफवा उडाली होती. त्यापार्श्वभूमीवर आरबीआयचं हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे.

आरबीआय रिपोर्टनुसार, रिझर्व बँक Rs 2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 हजाराच्या नोटा जारी करते. देशात अनेक ठिकाणी 1 रुपयाचं नाणं व्यवहारात स्वीकारलं जात नाही. काही ठिकाणी तर 10 रुपयाचं नाणही घेतलं जात नाही. 50 पैशाच्या नाण्याची तर अवस्थाच विचारु नये. ह्या सगळ्यावर रिपोर्टमध्ये आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे. 50 पैसे, 1 रुपया, 2, 5, 10 आणि 20 रुपयाचे नाणेही चलनात असल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. म्हणजेच, वर उल्लेख केलेल्या कुठल्याच नाण्यावर बंदी नाही.

बाजारात कोणत्या मुल्याच्या किती नोटा आहेत याची माहितीही रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. जेवढ्या नोटा बाजारात आहेत, त्यापैकी 85.7 टक्के नोटा ह्या 500 आणि 2000 रुपयांच्या आहेत. 31 मार्च 2020 पर्यंत ही टक्केवारी 83.4 टक्के एवढी होती. बाजारात सर्वाधिक नोटांची संख्या ही 500 रुपयांच्या चलनाची आहे. एकूण चलनाच्या 31.1 टक्के एवढ्या पाचशेच्या नोटा बाजारात आहेत. त्यानंतर सर्वाधिक नोटा ह्या 10 रुपयांच्या आहेत, त्यांची एकूण चलनातली टक्केवारी ही 23.6 टक्के एवढी आहे. 31 मार्चपर्यंतच्या चलनाची ही माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.