फ्रेंड्स : द रियुनियन’ 90 च्या दशकाचा आवडता शो ‘फ्रेंड्स’चा शेवटचा सीझन गुरुवारी प्रदर्शित झाला. फ्रेंड्सच्या नवीन सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक झाले होते. हा शो भारतातही खूप पसंत केला जात आहे. शोचा शेवटचा सिझन काल (27 मे) झी 5 वर रिलीज झाला आहे आणि काही तासांतच त्याने भारतात एक नवीन विक्रम स्थापित केला आहे.
फ्रेंड्स रियुनियन पाहण्यासाठी चाहते खूप उत्साही होते. झी 5 वर याचा प्रीमियर होताच, लोकांनी त्याच वेळी तो पाहण्यास सुरुवात केली होती. इतकेच नाही, तर सोशल मीडियावर या शोविषयी भावनिक पोस्टही शेअर केल्या गेल्या. झीच्या डिजिटल बिझनेस प्रमुखांनी माहिती देताना म्हटले की, आतापर्यंत 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी हा शो पाहिला आहे.
झी डिजिटल बिझिनेस अँड प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष अमित गोयंका म्हणाले की, ‘फ्रेंड्स द रियुनियनला झी 5 वर खूप व्हूज मिळाले आहेत, याचा आम्हाला खूप आनंद झाला. यात 10 लाखाहून अधिक लोकांनी हा सिझन पाहिला आहेत आणि अद्याप ही मोजणी चालूच आहे. या शोच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी लाखो स्क्रीनवर हा शो प्ले केल्याचा आम्हाला अभिमान आहे.
104-मिनिटांच्या फ्रेंड्स द रियुनियनमध्ये जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्वाइमर मुख्य भूमिकेत आहेत. यासह, जस्टीन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, लेडी गागा, टॉम सेलेलक, जेम्स मायकेल टायलर, मॅगी व्हिलर, रीझ विदरस्पून आणि मलाला यूसुफजई पाहुण्यांच्या भूमिकेत दिसले आहेत.