अत्याचार पीडित मुलीच्या वडिलांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने फसवलं, 1 लाख 40 हजारांना घातला गंडा

बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे अत्याचार पीडित अल्पयीन मुलीच्या वडिलांना तुम्हाला न्याय मिळवून देतो म्हणून राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षाने तब्बल एक लाख 40 हजार रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याची बातमी न्यूज 18लोकमतने दाखवल्यानंतर आरोपी अखिल मोहम्मद सय्यद या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर अखेर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल सय्यद हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून तो पोलीस मित्र म्हणून देखील माजलगाव परिसरात परिचित आहे. त्याने पीडित मुलीच्या वडिलांना कारवाई करण्यासाठी पैसे लागतात असल्याचं सांगून त्यांच्याकडून टप्याटप्याने एक लाख 40 हजार रुपयाची रक्कम उकळली.  एवढे पैसे देऊनही आरोपीला अटक होत नसल्याने अखिल सय्यद यांनी आपली फसवणूक केल्याचं लक्षात आले.

त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी न्याय मिळत नसल्याने दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर तीन दिवसापासून आमरण उपोषण चालू केले होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयाने आमरण उपोषण सुरू करताच या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी दखल घेत  मुख्य आरोपी अखिल मोहम्मद सय्यद यासह सुनील दिलीप वाव्हळकर, सय्यद फरहाना, विलास खाडे याच्यासह काही अज्ञात इसमावर फसवणुकीचा गुन्हा दिंद्रुड पोलिसांत दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.