तैवान हादरलं! 2 दिवसांत 100 पेक्षा अधिक धक्के
तैवानमध्ये भूकंपाने हाहाकार माजवला आहे. भूंकपामुळे तैवान हादरलं आहे. भूकंपामुळे तैवानमधील बरीच ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत. भूंकपाने हादरलेल्या तैवानचे भयंकर व्हिडीओ समोर आले आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून तैवानमधील भूंकपाची तीव्रता समोर येते आहे. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येईल.
दक्षिण पूर्व परिसरात शनिवारी भूंकपाचे तीव्र धक्के बसले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी भूंकप झाला आहे. गेल्या दोन दिवसांत 100 पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के बसले आहेत. हुआलियन आणि टाइटुंहला भूकंपाचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. तैवानच्या न्यूज एजन्सीनुसार टाइटुंग क्षेत्रात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर अंतरावर होता. भूंकपाची तीव्रता 7.2 आहे.
‘आदित्य ठाकरे गद्दार, शिंदेंबद्दलचा तो निर्णय एका दिवसात बदलला’, रामदास कदमांच्या भात्यातून नवा बाण!
आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 100 कोटी रुपये घेतले, असा खळबळजनक आरोप काल रामदास कदम यांनी केला होता, यानंतर आता आज पुन्हा एकदा कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘आदित्य ठाकरे खोके खोके करत फिरत आहेत. कोण गद्दार? आदित्य ठाकरे गद्दार. कोणाला गद्दार म्हणताय,’ अशी टीका रामदास कदम यांनी केली.
‘प्लास्टिक बंदीचा कायदा केला, पण आदित्य ठाकरे कायदा मी केला म्हणतात. खरा गद्दार आदित्य ठाकरे आहे, त्यांनी मला संपवण्याचं काम केलं. मातोश्रीवर मिठाईचे खोके जातात, तुम्ही कुणाला खोके सांगतायत. खोके, खोके, बोके कुणाला म्हणता? हळू हळू सगळं बाहेर पडेल’, असा पलटवार रामदास कदम यांनी केला आहे.
राज विदर्भात, अमित मुंबईत, मनसेमध्ये वेगवान घडामोडी, इंजिनात भाजपला जागा नाही?
आगामी मुंबई महापालिका निडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर गेले असताना इकडे मुंबईतही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे उद्यापासून मुंबईतील शाखाप्रमुखांना वन टू वन भेटणार आहेत.
अमित ठाकरे मुंबईतील सहा लोकसभा निहाय शाखाप्रमुखांना भेटणार आहेत. ते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा शाखाप्रमुखांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित ठाकरे वॉर्ड निहाय पक्षाच्या परिस्थितीचा शाखाप्रमुखांकडून आढावा घेणार आहेत.
रायपूरमध्ये बालाजी मंदिरात फॅशन शोचे आयोजन, बजरंग दलाचा निषेध, तक्रार केली दाखल
छत्तीसगडमधील रायपूर येथील सालासर बालाजी मंदिरात फॅशन शोचे आयोजन करण्यात आलं होतं. तेलीबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालासर मंदिरात एफडीसीए नावाच्या कंपनीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या फॅशन शोवर बजरंग दलाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. हिंदू धार्मिक स्थळावर फॅशन शोचं आयोजन केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
या फॅशन शोचा व्हिडीओ समोर आला असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, बजरंग दलाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाचा निषेध करत असून मंदिरात असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांकडून स्पष्टीकरण मागत असल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. बजरंग दलाचे जिल्हा निमंत्रक रवी वाधवानी आल्यावर त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांची साद, ठाकरे देणार का प्रतिसाद? एकनाथ शिंदेंनी पुढे केला मैत्रीचा हात!
जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये सत्तानाट्य घडलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष अशा 50 जणांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात रोजच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, पण आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना मैत्रीसाठी साद घालण्यात आली आहे. यानंतर आता याला उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
राजस्थानमध्ये पक्षाच्या कार्यक्रमातच काँग्रेस नेते एकमेकांना भिडले
राजस्थान काँग्रेसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की पक्षाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले काँग्रेसचे नेते आपापसातच भिडले आहेत. इतर नेते व कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटले. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील या कार्यक्रमाला येणार होते.शनिवारी (१७ सप्टेंबर) दुपारी जयपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांची महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, अजय माकन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच काँग्रेस सेवादलाचे नेते अंतर्गत वादातून एकमेकांना भिडले.
कोरोनानंतर Monkeypox ची महासाथ? पुण्यातून सर्वात धक्कादायक अपडेट
कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. त्यात मंकीपॉक्सचीही प्रकरणं समोर आली आहेत. मंकीपॉक्स रुग्णांची संख्या वाढली असताना आता याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंकीपॉक्सबाबत पुण्यात अशी महत्त्वाची अपडेट मिळाली आहे, ज्यामुळे आता कोरोनानंतर मंकीपॉक्सची महासाथ येते की काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे आता प्रशासन यंत्रणाही सतर्क झाली आहे.
भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण 13 रुग्ण आहेत. त्यापैकी 8 दिल्ली आणि 5 केरळात आहेत. आता मंकीपॉक्सबाबत नुकताच एक अहवाल जारी करण्यात आला आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने हा अभ्यास केला आहे. देशातील मंकीपॉक्स व्हायरसच्या नमुन्यांचं जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं. त्यानुसार मोठी माहिती मिळाली आहे.पुण्यातील ICMR-NIV चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रयाग यादव म्हणाले, जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये सापडलेले केरळ आणि दिल्लीतील अनुक्रमे पाचही रुग्णांच्या नमुन्याचं जीनोम सीक्वेन्सिंग झालं आहे. भारतातील 90 ते 99 टक्के जीनोम A.2 ग्रुपशी संबंधित आहे. हा IIb जोडलेला आहे.
“ऑस्ट्रेलियाला हरवलं नाही तर विश्वचषक जिंकणं अवघड”,माजी खेळाडूचे मोठे विधान
ऑस्ट्रेलियाचा संघ सहा वर्षांनंतर टी२० सामने खेळण्यासाठी मोहालीत येणार आहे. भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या टी २० मालिकेतूनच भारतीय संघ आगामी टी२० विश्वचषकाची तयारी करत आहे. आशिया चषकात झालेल्या पराभवानंतर भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अशातच भारतीय संघाच्या माजी खेळाडूने कर्णधार रोहित शर्माला मोठे आव्हान दिले आहे.कर्णधार रोहित शर्माच्या संघाला गौतम गंभीरचे आव्हान म्हणाला “एकतर ऑस्ट्रेलिया संघाला हरवा नाहीतर विश्वचषकच विसरा.” दरम्यान, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा हे २००७ मध्ये टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते.
SD Social Media
9850 60 3590