आता विना इंटरनेट पैसे पाठवणे शक्य होणार

विना इंटरनेट ग्राहकांना एकावेळी 200 रुपये तर एकूण 2000 रुपयांचा व्यवहार करता येणार आहे. फेस टू फेस (Face to Face) तंत्रज्ञानाचा वापर करुन हा व्यवहार करता येईल. अर्थात यासाठी दोन्ही पक्षांची उपस्थिती आवश्यक आहे. 200 रुपयांचा हा व्यवहार ऑफलाईन असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी पुढाकार घेतला आहे. व्यवहार सुधारणेवर भर देण्यातील ही पहिली पायरी आहे. ग्राहकांना सहजरित्या व्यवहार करता यावे, यासाठी कमी मूल्याधारित डिजिटल व्यवहाराचे नियम तयार करण्यात येत आहेत. 200 रुपये ही सध्याची त्याची कमाल मर्यादा आहे. ऑफलाईन पद्धतीने एकूण 2000 रुपयांची रक्कम समोरच्या व्यक्तीला तुम्ही पाठवू शकणार आहात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑफलाईन व्यवहारांसाठी नवे नियम तयार केले आहेत. या नियमातंर्गतच ऑफलाईन व्यवहाराची ही नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.या पायलट प्रकल्पाची यापूर्वीच चाचणी करण्यात आली आहे. सप्टेंबर 2020 ते जुलै 2021 या दरम्यान ऑफलाईन व्यवहाराची चाचणी करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सकारात्मक परिणामानंतर गेल्या वर्षी 6 ऑगस्ट रोजी याविषयीच्या पायलट योजनेला मंजूरी दिली होती. ऑफलाईन अथवा बिना इंटरनेट व्यवहारांना चालना देण्यासाठी विशेष योजनेवर काम करण्याची आवश्यकतेवर या योजनेत भर देण्यात आला आहे. सध्या हा प्रकल्प अल्प किंमत असलेल्या व्यवहारांना समोर ठेऊन कार्यान्वीत करण्यात आला आहे. या व्यवहारांमुळे इंटरनेटची दादागिरी तर जिरेलच परंतू, कॅशलेस इकॉनॉमी अर्थात व्यवहारांसाठी प्रत्यक्षात नोटांचा वापर न करणारी अर्थव्यवस्था उभारणीला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना या सुविधेचा सर्वाधिक लाभ होणार आहे. तसेच डोंगराळ आणि दुर्गम भागातील लाखो लोक या प्रकल्पामुळे कॅशलेस व्यवहार करण्यात सक्षम होतील यातील शंका नाही.

सध्या स्मार्टफोनचा जमाना असला तरी ग्रामीण भागात अनेक लोकांकडे सर्वसामान्य मोबाईल, फीचर मोबाईल आहेत. त्यामध्ये इंटरनेटचा वापर होत नाही. अशा लोकांना डिजिटल पेमेंट स्कीममध्ये जोडण्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्वीपासूनच प्रयत्नात होती. जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, 2019 मध्ये भारतातील 41 टक्के लोकसंख्येकडे इंटरनेट डाटाचा वापर होता. याचा अर्थ उर्वरीत 49 टक्के जनता इंटरनेटपासून कोसो दूर आहे. ही मोठी संख्या आहे. त्यामुळे फीचर मोबाईलमध्ये ही ऑफलाइन पद्धतीने इंटरनेट सुविधेचा हा प्रयोग भारतात क्रांती घडविल्याशिवाय राहणार नाही हे नक्की

कसा होईल व्यवहार

रिझर्व्ह बँकेने किमान 200 रुपयांचे व्यवहार ऑफलाईन केले आहेत.

एकावेळी 200 आणि संबधित डिव्हाइससाठी 2000 रुपयांचा व्यवहार होऊ शकेल

व्यवहार करतेवेळी दोन्ही पक्षांची उपस्थिती अनिवार्य आहे

ग्राहकाच्या अनुमतीशिवाय हा व्यवहार पूर्ण होणार नाही

ऑफलाईन व्यवहारासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाईल वॅलेट आणि मोबाईल डिव्हाइसचा वापर होईल

दोन्ही पक्षाच्या उपस्थितीत हा व्यवहार संपूर्ण सुरक्षित असेल

या संपूर्ण व्यवहारासाठी इंटरनेट सेवेची आवश्यकता नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.