झी मराठीच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर यासारख्या दिग्गज महिला सहभागी झाल्या होत्या. यानंतर आता या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे शुक्रवारी सहभागी झाल्या. नुकतंच या कार्यक्रमाचे काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंना सक्रीय राजकारणाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले.
बस बाई बस कार्यक्रमाचा प्रोमो झी मराठीने शेअर केला आहे. यात सुबोध भावे हे पंकजा मुंडे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी सुबोध भावेंनी पंकजा मुंडेंना एका खेळादरम्यान दुसऱ्या पक्षातील आमदार फोडलेत का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर पंकजा मुंडेंनी हो असे उत्तर दिले. त्यावर सुबोध भावेंनी कोण कोण आणि कधी कधी असे विचारताच पंकजा यांनी सर्व सांगितलं तर अजून एक तास लागेल, असे मिश्किलपद्धतीने सांगितले. त्यावर सुबोध भावेही आम्हाला चालेल असे म्हटलं.
त्यापुढे पंकजा मुंडेंनी त्यांच्या सक्रीय राजकारणाबद्दल गुलदस्त्यात असणाऱ्या काही गोष्टी शेअर केल्या. यावेळी त्या म्हणाल्या, अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. माझ्या जिल्ह्यात अनेक राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. राजकारणाच्या एका विशिष्ट पदावर मी काम करते.
मला बाबांनी एक वाक्य नेहमी सांगितलं की बेरीजेचे राजकारण करायचे, वजाबाकीचे नाही. त्यामुळे आपल्याकडे बेरीज होते का याकडे पाहायचे. राजकारणात आणि युद्धात जिंकणं महत्त्वाचं आहे. अशा परिस्थिती आपल्याला शोभेल अशी लोकं घेण्याचा मी तरी प्रयत्न करते. मी बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या नमिता मुदंडा ज्या आता भाजपच्या आमदार आहेत. तसेच सुरेश धस आहेत. त्यामुळे आमच्याकडे येणे-जाणं चालूच असतं, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
त्यांचे हे स्पष्टपणे दिलेले उत्तर ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी विविध गोष्टींवर भाष्य केले. यावेळी दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? असा प्रश्न सुबोध भावेंनी विचारला होता. त्यावर पंकजा मुंडेंनी फ्लिमी स्टाईलमध्ये उत्तर दिलं. एक एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवल्यानंतर पंकजा मुंडे यांना सुबोध भावेनं ‘तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला’, असं म्हटलं. त्यावर पंकजा ताई म्हणाल्या, ‘मी काहीही बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी बोलतच नाही. कारण त्यांनी आम्हाला इतक्या लवकर आम्हाला असं अर्ध्यावर टाकून जायला नको होतं’. उत्तर देत पंकजा मुंडेना अश्रू अनावर झाले.