कलाकारांचे हटके लुक आले समोर
स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या पाच मालिका या वाहिनीवरील आहेत. या मालिकांमध्ये सध्या श्रावण सणांची रेलचेल दाखवली आहे. स्टार प्रवाहाच्या विविध मालिकांमध्ये सध्या मंगळागौर आणि रक्षाबंधन हे सण उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा या मालिकांना सध्या भरघोस प्रतिसाद मिळतोय. या विविध मालिका तर प्रेक्षकांचं दररोज मनोरंजन करत आहेतच मात्र आता स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना मनोरंजनाच डबल डोस मिळणार आहे. स्टार प्रवाहाच्या सगळ्या कलाकारांना एकाच मंचावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. स्टार प्रवाहचा यंदाचा गणेशोत्सव सोहळा अतिशय दिमाखदार असणार आहे.
येत्या २८ ऑगस्टला ‘Star प्रवाह परिवार गणेशोत्सव 2022 गजर अष्टविनायकाचा’ हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. यंदाचा हा सोहळा अतिशय वेगळा असणार आहे. स्टार प्रवाहाच्या मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके कलाकार बहारदार नृत्य सादर करताना दिसणार आहेत. या सोहळ्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या पुन्हा एकदा डान्स करताना दिसणार आहेत.
या वर्षीच्या सोहळ्याची खासियत म्हणजे यंदा ‘Star प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२ गजर अष्टविनायकाचा’ मध्ये अष्टविनायकाची कथा नृत्याद्वारे प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. या सोहळ्याचे प्रोमो प्रदर्शित झाले आहेत त्यानुसार स्टार प्रवाहचे कलाकार अष्टविनायकाच्या कहाण्यांवर बहारदार नृत्य सादर करणार आहेत. प्रेक्षकांना अष्टविनायकाची माहिती अतिशय इंरटेस्टिंग पद्धतीने मिळणार आहे. अतिशय आगळेवेगळे सादरीकरण पाहण्यासाठी आता प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत.
समोर आलेल्या प्रोमो मध्ये सगळ्यांचा लाडका शंतनू म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारी त्रिपुरासुराचा वध या सादरीकरणामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत दिसत आहेत. तर फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम आणि अबोली तील अंकुश कथा बल्लाळेश्वराची हे सादरीकरण करणार आहेत. हे नायक नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.
या वर्षीच्या गणेशोत्सव सोहळ्यात स्टार प्रवाहाच्या नायिका देखील डान्स करताना पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या नायिकांना पाहायला नेहमीच आवडतं. वर्षा उसगावकर आणि हर्षदा खानविलकर या स्टार प्रवाहाच्या सासवा खास डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता हा सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.