दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा वेरिएंट आढळला

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा वेरिएंट आढळला आहे. या नव्या वेरिएंटमुळं 100 हून अधिक लोक संक्रमित झाले आहे. कोरोनाचा नवा वेरिएंट समोर आल्यानंतर दक्षिण आफ्रिका सरकार अलर्ट झालं आहे.तिथल्या सरकारनं प्रयोगशाळांच्या सहकार्यानं नव्या वेरिएंटनं संसर्गित होणाऱ्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा वेरिएंट किती संक्रामक आणि धोकादायक आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या द नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेशन डिसीजच्या माहितीनुसार हा वेरिएंट संक्रामक असू शकतो. भारत सरकार (India Government Alert) यामुळं अलर्ट झालं आहे. भारतानं सर्व आंतररराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचाणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एनसीआडीनं नवी कोरोना वेरिएंटचं नाव B.1.1.529. असल्याचं म्हटलं आहेय दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं NGS-SA च्या सदस्य असणाऱ्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना तात्काळ जिनोम सिक्वेसिंग करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा नवा संक्रामक किती घातक आहे याची तपासणी करण्याचा हेतू या मागे आहे. भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूष यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळं व्हिसा संबंधी आणि देशात येण्यासाठी देण्यात आलेली सूट यामुळं देशासमोरील अडचणी वाढू शकतात त्यामुळं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

भारत सरकारच्या आरोग्य सचिवांनी परदेशातून आलेल्या लोकांचं ट्रॅकिंग करण्यास सांगितलं आहे. जे लोक दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना किंवा हाँगकाँग येथून येतात त्यांची आरोग्य चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय त्यांचे नमुने घेऊन INSOCAG येथे जिनोम सिक्वेंसिग साठी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आफ्रिकेतील एनसीआयडीचे डॉ. मिशेल ग्रमु यांनी लोकांना नव्या वेरिएंटपासून संसर्गित होण्यापासून स्वत: चा बचाव करण्यास सांगितलं आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनावरील लस घेतली असली तरी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचां आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा नवा वेरिएंट किती धोकादायक आहे हे माहिती नसल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.