आज पहाटे साडेपाचच्या सुमारास म्यानमार -भारत सीमा भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूंकप ढाक्यासह पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये तर भारतात त्रिपुरा आणि आसामध्ये झाला. 6.3 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे. कोलकात्यामध्ये देखील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त समोर येत आहे. युरोपीयन-भूकंप केंद्रांकडून (emsc) याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या शक्तीशाली भूंकपामध्ये किती नुकसान झाले आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही.
दरम्यान आज झालेल्या भूकंपाचे धक्के हे बांग्लादेशच्या चितगाव आणि ढाक्यात प्रामुख्याने जाणवले त्याचा फटका हा काही प्रमाणात भारताला देखील बसला. भारतातील त्रिपुरासह आसाम आणि कोलकात्यात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बागलादेशात यापूर्वीही मोठा भूकंप होण्याचा इशारा भूतज्ज्ञांकडून देण्यात आला होता. बागलादेशात भूंकप झाल्यास त्याचा फटका हा पूर्व भारतालाही बसून शकतो असेही तज्ज्ञांनी सांगितले होते.
वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात त्यांना आसे आढळून आले आहे की, जगातील सर्वात मोठय़ा नदी त्रिभुज प्रदेशात दोन प्रस्तर ताणाखाली असून, ते केव्हाही एकमेकांना ढकलू शकतात व त्यामुळे भूकंप होईल. हा भूकंप झाला तर किमान बांगलादेश व भारतातील 140 दशलक्ष लोकांना फटका बसेल. मोठय़ा नद्या व समुद्राची वाढती पातळी यामुळे हे बदल घडून येत आहेत. यात सबडक्शन झोन तयार होत असून, पृथ्वीची एक टेक्टॉनिक प्लेट दुसरीला ढकलत असते.