लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे 2 दिवसीय काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लष्कर प्रमुख नरवणे यांना सैन्याच्या तयारीची माहिती दिली.
नरवणे यांनी भारत आणि पाकिस्तानमधील सीझफायरच्या 100 व्या दिवशी या भागाला भेट दिलीय.
मागील काही दिवसांमध्ये लष्कर प्रमुखांनी युद्ध रणनीतीच्या पातळीवर भारताच्या महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना भेट देत पाहणी केली. तसेच सैन्याच्या तयारीची माहिती घेतली.
भारताचे दोन्ही शेजारी राष्ट्र चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती कायम सुरू असल्याने ते भारताच्या सुरक्षेला कायमच धोका असतात. त्यांना तोंड देण्यासाठीच सैन्याकडून आपली चोख तयारी ठेवली जाते.