राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्ह्यांची कोरोना संसर्ग दरानुसार केलेल्या वर्गवारीत नाशिक जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला. पुण्याचा संसर्ग दरही कमी झाल्याचं सांगितलं मात्र तेथील निर्बंध कायम ठेवले. यानंतर नाशिकचा पहिल्या टप्प्यात समावेश झाल्याने नाशिकचे महापौर यांनी समाधान व्यक्त केलं. तसेच नाशिक महापालिका प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
नाशिक पालिका आयुक्तांनी सांगितलं, “शेवटी लॉकडाऊन किती दिवस करणार आहेत. याला आता महिना दीड महिना होत आलाय. लॉकडाऊनमुळे संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेलीय. त्यामुळे आता जबाबदारी नाशिककरांची आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज आहे.”
दरम्यान आज राज्यात अनलॉकवरुन जसा गोंधळ पाहायला मिळाला तसाच गोंधळ याआधी पुण्यातही पाहायला मिळाला होता. राज्याच्या पातळीवर नवी नियमावली जाहीर झाल्यानंतर पुण्याच्या महापौरांनी सलून, स्पा आणि जिम सुरु होतील असं म्हटलं. मात्र, आयुक्तांनी राज्य सरकारच्या नियमांचा हवाला देत सलून, स्पा आणि जिम सुरू करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलं.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सलून, स्पा, जिम बंद राहणार! पुणे मनपा हद्दीत आपण निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून, पार्लर, स्पा, जिम बंद ठेवण्यात येत आहे. सलून आणि पार्लर सुरु ठेवण्याचा निर्णय आपण स्थानिक पातळीवर घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला आहे.