जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त डिमॅट अकाऊंट असेल तर एका अकाऊंटचे शेअर दुसऱ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करता येतात. हे तुम्ही मॅन्युअली किंवा ऑनलाईन करू शकता. शेअर बाजारात पैसा लावण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणं गरजेचं असतं. बिना डिमॅट अकाऊंटचे तुम्ही कोणतेही शेअर खरेदीविक्री करू शकत नाही. शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त डिमॅट अकाऊंट वापरू शकता. तुमचे वेगवेगळ्या ब्रोकरकडे डिमॅट अकाऊंट असेल तर, तुम्हाला एका अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये शेअर ट्रान्सफर करता येतात.
शेअर ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला 2 पद्धती वापराव्या लागतील. एक म्हणजे ऑनलाई आणि दुसरे मॅन्युअली…
मॅन्युअली डिमॅट अकाऊंटसाठी तुमच्या ब्रोकरकडून डिलिवरी इंस्ट्रक्शन स्लिप DIS घ्यावे लागेल. या स्लिपमध्ये शेअर ट्रान्सफर करण्यासंबधी संर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर हे शेअर्स ट्रान्सफर करावे लागतील.
या स्लिमध्ये तुम्हाला बेनिफिशयरी ब्रोकरचे आयडी आणि आताच्या ब्रोकरचे आयडी द्यावे लागेल. त्यानंतर या स्लिपमध्ये ट्रान्सफर करू इच्छिनाऱ्या शेअर्सचा आयडी भरणे गरजेचे आहे.
सर्व डिटेल भरल्यानंतर तुम्हाला तुमचे हस्ताक्षर करावे लागेल. नंतर सध्याच्या ब्रोकरकडे ते सबमीट करा. ट्रान्सफरसाठी ब्रोकर तुम्हाला चार्ज लावेल.
ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यासाठी सेट्रेल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड तुम्हाला EASIEST या फीचरची सुविधा देते. ज्या माध्यमांतून ऑनलाईन पद्धतीने एका डीमॅट अकाऊंटमधून दुसऱ्या डिमॅट अकाऊंटमध्ये शेअर्स ट्रान्सफर करता येतात. त्यासाठी आधी तुम्हाला CDSL च्या वेबसाईटवर लॉगइन करावे लागेल. त्याखाली दिलेल्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
रजिस्टर ऑनलईन लिंक EASIEST पर्यायवर क्लिक करा.
डिटेल्स भरा. प्रिंटआऊट काढा आणि आपल्या डिपॉजिटरी पार्टिसिपेंटला पाठवा.
डिपॉजिटरी पार्टिसिपेंट याला सेंट्रल डिपॉजिटरीकडे पाठवेल.
सेंट्रल डिपॉजिटरी तुमची डिटेल वेरिफाय करेन.
यानंतर 1 त 2 कामगाजाच्या दिवसांमध्ये शेअर्स ट्रान्सफर होतील.