अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार

येत्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. या दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. हे चक्रीवादळ कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून 18 मेच्या संध्याकाळी मार्गक्रमण करेल. त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल.

चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 14 मे रोजी कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल.

तर 15 मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. या चक्रीवादळादरम्यान समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेगही प्रचंड असेल.
तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.