तब्बल ४४ लाख रुपयांची बोली
लावत सरपंचपद जिंकलं
सरपंचपदासाठी निवडणुक न घेता बोली लावत पद विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील एका गावातील रहिवाशांनी सर्वाधिक बोली लावणाऱ्याला सरपंचपद विकलंय. गावातील इतर चार जणांना पराभूत करत एका व्यक्तीनं हे पद जिंकलंय. या व्यक्तीने तब्बल ४४ लाख रुपयांची बोली लावत सरपंचपद जिंकलं. ४४ लाखांची अंतिम बोली लावल्यानंतर त्या व्यक्तीची एकमताने सरपंचपदासाठी नेमणूक करण्यात आली. दुसरीकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र या पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासह योग्य निवडणूक प्रक्रिया पाळावी लागणार असल्याचे सांगितले.
सेक्स स्कँडलचा आरोप असलेले
मंत्री मिलिंद नाईक यांचा राजीनामा
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सेक्स स्कँडलचा आरोप केल्याच्या काही तासांनंतरच गोव्याचे नगरविकास आणि समाजकल्याण मंत्री मिलिंद नाईक यांनी संध्याकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “नाईक यांनी मुक्त आणि निष्पक्ष तपासासाठी राजीनामा दिला आहे आणि मी तो स्वीकारला आहे. काँग्रेसने जे काही पुरावे दिले आहेत त्याची चौकशी केली जाईल.” ते म्हणाले की नाईक आपली बाजू मांडतील आणि वैयक्तिक पातळीवर लढतील. सावंत म्हणाले, “त्यांच्यावर केलेले आरोप हे वैयक्तिक आहेत आणि त्यावर ते काय करतील हा त्यांच्या वैयक्तिक निर्णयाचा विषय असेल.”
अजयकुमार मिश्रा यांना राजीनामा
द्यावाच लागेल : राहुल गांधी
जेव्हा मी लखीमपूर खेरीला गेलो, मी संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वचन दिलं होतं की काहीही झालं, तरी आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकून त्यांना न्याय देऊ. अर्थात, न्याय हा दबाव आणि संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही. काँग्रेसनं सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की तीन कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील आणि ते मागे घेतले गेले. मी म्हणतोय की केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना राजीनामा द्यावाच लागेल. ते तुरुंगात जाईपर्यंत आम्ही केंद्र सरकारवर दबाव टाकत राहू. मग भले त्यासाठी ५, १० किंवा १५ वर्ष लागोत. ते तुरुंगात जाईपर्यंत त्यांना सोडणार नाही”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले
राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू
कोनिका लायकची आत्महत्या
राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू कोनिका लायक हिने आत्महत्या केली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोनिकाला तिच्या खेळासाठी रायफल भेट दिली होती. २६ वर्षीय कोनिका लायक झारखंडच्या धनबादची रहिवासी होती. या नवोदित खेळाडूच्या निधनाने क्रीडा जगताला धक्का बसला आहे. माजी ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते जयदीप कर्माकर यांच्यासोबत कोनिका कोलकाता येथे प्रशिक्षण घेत होती, असे सांगण्यात येत आहे.
बैलगाडा शर्यतीला
महाराष्ट्रात सशर्त परवानगी
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.यापूर्वी मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. कोर्टाच्या निर्णयानंतर मोठा दिलासा मिळाला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे
दोघांना ओमायक्रॉनचा संसर्ग
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील ४२ वर्षीय व्यक्तीसह त्याच्या १६ वर्षीय मुलास ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सायंकाळी यासंदर्भातील माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेतील सूत्रांकडून मिळाली आहे. संबंधित व्यक्ती व त्याचे कुटुंबीय हे नुकतेच विदेशवारी करून आलेले आहेत. गुंतवणुकीचा व्यवसाय करणारा ही व्यक्ती दुबईतील शारजाह येथून परतली आहे.
बाळा नांदगावर शिवसेनेत
प्रवेश करणार असल्याची चर्चा
मनसेचा आणखी एक मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
रुपाली पाटील यांच्यानंतर राज ठाकरेंसोबत सावलीप्रमाणे असणारे बाळा नांदगावर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर बाळा नांदगावर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंनी आणखी एक मोठा धक्का बसणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
किरीट सोमय्या मला प्रश्न
विचारू शकत नाहीत : अनिल परब
किरीट सोमय्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण मी किरीट सोमय्यांना बांधील नाही. किरीट सोमय्या मला प्रश्न विचारू शकत नाहीत. ज्या अधिकृत संस्थांनी- यंत्रणांनी मला प्रश्न विचारले आहेत त्यांना मी उत्तरे दिली आहेत. जिल्हाधिकारी, पोलिसांसमोर सर्व कागदपत्रं आहेत. या रिसॉर्टशी माझा संबंध नाही हे मी वारंवार सांगत आहे. पण बदनानी कऱण्यासाठी जाणूनबुजून माझा संबंध जोडत आहेत. शासकीय यंत्रणा याबाबत योग्य ती कारवाई करतील,” असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.
वसई पूर्वेच्या परफ्यूम
कारखान्याला भीषण आग
वसई पूर्वेच्या पोमण जवळील साष्टीकरपाडा येथे परफ्यूम तयार करण्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात माल जवळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वसई पूर्वेतील भागात पोमण ग्रामपंचायत हद्दीतील साष्टीकरपाडा परिसर आहे.
Earphones वर सतत मोठ्या आवाजात ऐकताय? बहिरेपणाचा धोका, WHO चा इशारा
आजूबाजूच्या कोणालाही त्रास होऊ न देता एकट्याने गाण्यांचा घ्यायचा असेल, तर इयरफोन्सना पर्याय नाही. पण इयरफोन्सचा प्रमाणापेक्षा जास्त वेळ वापर झाला, तसंच इयरफोन्सवर दीर्घ काळ मोठ्या आवाजात संगीत ऐकत राहिलं, तर बहिरेपणा येऊ शकतो. अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एक अब्जाहून अधिक तरुणांना बहिरे होण्याचा धोका आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या इयरफोन्स वापरण्याच्या पद्धती. त्यामुळेच योग्य काळजी घेतली तर हे संभाव्य बहिरेपण टाळता येण्यासारखं आहे.
मुंबईत 64,700 लोकसंख्येसाठी एकच दवाखाना; प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड
प्रजा फाउंडेशनकडून आमदारांच्या कामाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालातून मुंबईतील लोकसंख्या आणि रुग्णालयांचे व्यस्त प्रमाण दिसून येत आहे. 2020 पासून मुंबईत मृत्युच्या कारणांची माहिती दिली जात नाही. मुंबईत 64,700 लोकसंखेसाठी एक दवाखाना आहे. मुंबईत आजही 1 लाख लोकसंख्येमागे 298 जणांना टिबी होत असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.
SD social media
9850 60 3590