शेतकऱ्याने काळ्या बटाट्याचे उत्पादन घेऊन भरपूर पैसे कमावले, असं सांगितलं तर? तुम्ही आम्हाला वेड्यात काढला ना? पण हे सत्य आहे. बिहारच्या गयामध्ये एका शेतकऱ्याने अमेरिकेतून काळ्या बटाट्याचे बियाणे मागवले होते. यानंतर त्यांनी प्रयोग म्हणून कमी जमिनीत याची लागवड केली, ज्याचे पहिले पीक आले आहे. हा बटाटा अप्रतिम असून त्याला मागणीही खूप आहे.
टिकारी ब्लॉकच्या गुलरियाचक गावात शेतकरी आशिषने काळ्या बटाट्याची लागवड केली होती. आशिषने 10 नोव्हेंबर रोजी बी पेरले होते आणि 120 दिवसांनी 13 मार्च रोजी उत्पादन घेतलं. 14 किलो बियाण्यांची लागवड केली होती. ज्यामध्ये सुमारे 120 किलो बटाटे तयार झाले. साधारणपणे काळ्या बटाट्याची लागवड अमेरिकेतील डोंगराळ प्रदेशातील अँडीज शहरात केली जाते. पण केवळ प्रयोग म्हणून बिहारच्या गयामध्येही त्याची लागवड करण्यात आली.
काळ्या बटाट्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, त्यामुळे बाजारपेठेत त्याची मागणी वाढली आहे. पिकाच्या लागवडीसोबतच आशिषला बिहार आणि इतर राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी काळ्या बटाट्याची मागणी करून संपर्क साधला. त्यांना सुमारे 200 किलो बटाट्याची मागणी आली होती. मात्र, तेवढे उत्पादन न झाल्याने ते बियाणांच्या रूपात काही बटाटे देण्याची तयारी करत आहेत.
शेतकरी आशिषने अमेरिकेतून काळ्या बटाट्याचे बियाणे मागवले होते, ज्यावर 1500 रुपये प्रति किलो खर्च झाला होता. यानंतर आशिषने सुमारे 2 गुंठा जमिनीत लागवड केली. सुरुवातीच्या काळात त्यांचे उत्पादन चांगले होते. मात्र, मध्यंतरी खराब हवामानामुळे चांगले उत्पादन मिळू शकले नाही. 14 किलो बियाण्यापासून सुमारे 200 किलो बटाटे तयार होतील, अशी अपेक्षा होती.
आशिषने सांगितले की, पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाईल. यावेळी ट्रायल म्हणून 14 किलो बटाट्याची लागवड करण्यात आली. ज्यामध्ये 1 क्विंटल 20 किलो बटाट्याचे उत्पादन झाले आहे. 300 ते 500 रुपये किलो दराने विक्री करणार असल्याचे शेतकरी आशिष यांनी सांगितले. आशिष हा बटाटा त्यांच्या आजूबाजूला आणि बिहारच्या इतर शेतकऱ्यांना देणार आहे जेणेकरून इथे त्याच्या लागवडीला चालना मिळेल. मात्र, पंजाब आणि छत्तीसगडसारख्या राज्यांतील शेतकऱ्यांकडूनही त्याची मागणी होत आहे.
काळ्या बटाट्याला सामान्य बटाट्यापेक्षा 20 दिवस जास्त वेळ लागतो. हे बटाटे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) द्वारे मोजले जातात, जे 0-100 पर्यंत असते. जर बटाट्याचा जीआय 70 पेक्षा जास्त असेल तर तो उच्च दर्जाचा मानला जातो. तुलनात्मक अभ्यासात काळ्या बटाट्याचे जीआय 77 असल्याचे आढळून आले आहे. तर पिवळ्या बटाट्याचा जीआय 88 आणि पांढऱ्या बटाट्याचा जीआय 93 आहे. गडद जांभळ्या बटाट्यांमध्ये अँथोसायनिन्स नावाचे पॉलिफेनॉल अँटिऑक्सिडंट्स विशेषतः समृद्ध असतात.
यूट्यूब वरून कल्पना
आशिष सांगता की त्यांना वाचनाची आणि यूट्यूबवर विविध गोष्टी पाहण्याची आवड आहे. यादरम्यान त्यांनी काळ्या बटाट्याची लागवड पाहिली. त्यात असे सांगण्यात आले की, काळ्या बटाट्याची लागवड भारतात जवळपास नगण्य आहे. हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी याची लागवड केली जाते. काळ्या बटाट्याचे पोषण आणि फायदे यूट्यूबमध्ये सांगितले होते. यानंतर त्यांच्या मनात काळ्या बटाट्याची लागवड करण्याचा विचार आला आणि त्यांनी त्याबाबत संपूर्ण माहिती मिळवली.