H3N2 : काळजी घ्या! कोरोनाचं नवं संकट पुण्यात धडकलं, 22 रुण आढळले

कोरोनाचा विसर पडल्यानंतर सर्वकाळी सुरळीत सुरू असताना आता H3N2 या नव्या व्हायरसने डोक वर काढलं आहे. देशभरात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आता हा व्हायरल महाराष्ट्रात धडकला आहे. पुण्यात H3N2 चे 22 रुग्ण आढळले आहे.

पुण्यात ‘H3N2 चे २२ रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे पुणे शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे 19ते 60 वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. यावरून या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. लक्षणं ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहे, त्यामुळे जीवघेणी बाब नसल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

सोमवारीच H3N2 विषाणू संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. सर्वच आरोग्य यंत्रणांनी H3N2 विषाणूवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले. ठाणे, मुंबई, पुणे या भागात जास्तीत जास्त लक्ष ठेवण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय. तसंच राज्यात अद्यापही कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू

देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR नं हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासनही देण्यात आले आहे. या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा सुनिश्चित करावा, रुग्णांचं बारकाईने निरीक्षण करावं, असं सांगितलं आहे. तसेच कमी प्रतिकारक क्षमता असलेल्या लोकांनी काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. ज्या जिल्ह्यात रूग्ण आढळले आहेत त्या जिल्ह्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सूचना करावी, असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.