कधी पाहिलं नसेल उपमुख्यमंत्र्यांचं असं रुप; नव्या कोऱ्या बुलेटवर फडणवीसांचा स्वॅग
देशभरात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. वर्ध्यातही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांच्यावर तिरंगा बाईक रॅलीत झेंडा दाखवण्याची जबाबदारी होती.त्यांनी मात्र थेट कार्यकर्त्यांची बुलेटच हातात घेत काही अंतर गाडी चालवित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. पण ज्या सामान्य कार्यकर्त्याची गाडी चालविली तो मात्र हरखून गेला आहे. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईचा अध्यक्ष बदलण्याच्या तयारीत दोघेही फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये पक्षांर्तगत पदाधिकारी बदलांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपमध्ये राज्यातील विविध पदांच्या बदल्या होण्याची शक्यता आहेत. दरम्यान मुंबई अध्यक्षपदासाठी माळ पुन्हा आशिष शेलार यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती आहे तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती भाजपमधील अधिकृत सुत्रांकडून देण्यात आली आहे.
रणवीरच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी मोठी अपडेट, मुंबई पोलिसांकडून नोटीस
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागच्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी चर्चेत आला आहे. एका मॅग्झीनसाठी केलेलं हे न्यूड फोटोशूट प्रकरण रणवीरला चांगलंच भोवलं आहे. मुंबईसह देशभरात रणवीर विरोधात अनेक ठिकाणी या प्रकरणी तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांसाठी हे प्रकरण निवळल्याचं वाटत होतं मात्र रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरण काही संपायचं नाव घेत नाही. रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणी नोटीस बजावण्यासाठी मुंबई पोलीस रणवीर सिंहच्या घरी दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस रणवीरच्या घरी पोहोचले मात्र रणवीर सिंह घरी नसल्याची माहिती समोर आली. दरम्यान रणवीर सिंह 16 ऑगस्टला मुंबईत परत येणार येणार असून मुंबई पोलिसांची नोटीस स्वीकारुन त्याचा खुलासा सादर करणार आहे. मुंबई पोलिसांनी काढलेल्या नोटीशीनुसार रणवीर सिंहला 22 ऑगस्टला चेंबूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. या निमित्तानं रणवीरचं न्यूड फोटोशूट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
अमरावतीत गुन्हेगारीचा हाहाकार, भर चौकात गोळीबार, 13 वर्षीय मुलीला लागली गोळी
अमरावतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण काही इसमांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही. ते भर रस्त्यात, चौकात छोट्या-मोठ्या वादातून गोळीबार करत असल्याचं उघड झालं आहे. या वाद आणि गोळीबारामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण तशीच घटना अमरावतीत घडली आहे. शहरात दोन तरुणांच्या वादात थेट गोळीबार झाला आणि या गोळीबारात 13 वर्षीय शाळकरी मुलीला गोळी लागली आहे.
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, 16 जिल्ह्यांसाठी अलर्ट, 4 जिल्ल्यांमध्ये धुवाँधार, विकेण्डचे 2 दिवस महत्त्वाचे
तुम्ही सुट्टीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण रविवारी 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 16 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर अर्वरित जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकींचा धडाका, राज्यात सत्तांतरानंतर गावागावांत आता कोणाची सत्ता?
राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला मतदान पार पडेल. ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. कारण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
नाना पटोले यांच्या नाराजीवर जयंत पाटील यांची सावध प्रतिक्रिया
महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आता तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेवरुन काँग्रेसने उघड नाराज व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरुन मित्र पक्षांवर टीका केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघातील निंभेरे येथे निळवंडे कालव्याच्या दोन किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे (टनेल) उद्घाटन माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपला SC चा झटका! राजकारण्यांच्या ‘मोफत वाटपा’च्या घोषणांवर महत्त्वाची टिप्पणी
फुकट वाटल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजेच Freebies आणि समाजाला उपयोगी असलेल्या योजना या दोन वेगवेगळ्या संकल्पना असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे समाजकल्याणाच्या योजना राबवणं आणि अर्थव्यवस्थेवर उगाचच ताण निर्माण करणं यामध्ये संतुलन साधण्याची गरज आहे, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आहे. निवडणुकीत Freebies ची आश्वासनं देणाऱ्या राजकीय पक्षांना बेदखल करावं म्हणजेच त्यांची मान्यता काढून घ्यावी या मागणीचा विचार करण्याची शक्यताही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. मोफत वाटपाची आश्वासनं देणाऱ्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची मागणी लोकशाहीविरोधी असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं.
भारतविरुद्धच्या सामन्याआधीच पाकिस्तानला झटका
यूएईमध्ये सुरू होत असलेल्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची चिंता वाढली आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यामुळे शाहिन आफ्रिदी भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर असू शकतो. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने हे मान्य केले आहे.
रिषभ पंत बनला उत्तराखंडचा ब्रँड अँबेसेडर, मुख्यमंत्री धामींकडून घोषणा
टीम इंडियाचा युवा शिलेदार रिषभ पंत नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यावरुन भारतात परतला आहे. भारतात परतताच आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी पंतचा खास सन्मान केला. धामी यांनी रिषभ पंतची उत्तराखंडचा नवा ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. नवी दिल्लीतील उत्तराखंड सदनमध्ये आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात धामी यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला रिषभ पंतनही हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री धामींच्या हस्ते पंतचा सत्कारही करण्यात आला.
SD Social Media
9850 60 3590