केंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक गोष्टी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प होता. यावेळी देखील अर्थमंत्र्यांनी पेपरविना अर्थसंकल्प मांडला.
महत्वाच्या घोषणा कोणत्या ?
कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर
त्यावर लागणारा सरचार्जही कमी करण्यात आला असून १२ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर आणला
कॉर्पोरेट टॅक्सची मर्यादा १० कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे
इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये चूक झाल्यास सुधारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळेल
क्रिप्टो करन्सीवर होणाऱ्या कमाईवर ३० टक्के कर
काय स्वस्त
कापड, चमड्याच्या वस्तू, मोबाइल, फोन चार्जर, चप्पल आणि हिऱ्यांचे दागिने स्वस्त होणार आहेत. तसंच शेतीची साधनं आणि परदेशातून येणाऱ्या वस्तू स्वस्त होतील.
अशी असेल आर्थिक करप्रणाली
५ लाखांपर्यंत कोणताही कर नाही
५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर
७.५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार
१० ते १२.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागणार
१२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर लागणार
१५ लाखांपुढच्या उत्पन्नावर पुढे ३० टक्के कर लागणार
शेअर मार्केटमधील तेजी कायम
अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतरही शेअर मार्केटमधील तेजी कायम आहे. शेअर मार्केटमध्ये ८७९ अंकांची वाढ झाली असून ५८ हजार ८९३ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये २३४ अंकांची वाढ झाली असून १७ हजार ५७४ वर पोहोचला आहे.
आयकरात कोणताही बदल नाही
आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याने सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. सलग सहाव्या वर्षी कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्हर्च्यूअल करन्सीतून होणाऱ्या कमाईवर ३० टक्के कर लावण्यात आला आहे.
5G सेवा २०२२-२३ मध्ये सुरु करणार
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये खासगी कंपन्यांद्वारे 5G दूरसंचार सेवा मिळवण्यासाठी 5G स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाईल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
११२ जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न
देशातील मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी काम करण्यात येणार असून ११२ जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या जिल्ह्यातील तालुक्यांच्या विकासासाठी, गावांना रस्त्यानं जोडण्यासाठी विलेज इन्फ्रास्ट्रक्चर योजना आणण्यात आली आहे. यासाठी सध्याच्या योजनांचं एकत्रीकरण केलं जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.
पहिली ते बारावीसाठी चॅनेल
PM eVIDYA मधील वन क्लास वन टीव्ही चॅनेल योजना वाढवण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरु करणार असून त्याची संख्या १२ वरुन २०० पर्यंत वाढवण्यात येईल. प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील. यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजीटल साधनांचा वापर करण्यात येईल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
हा अर्थसंकल्प गरिबांच्या
कल्याणासाठी : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी हा अर्थसंकल्प गरिबांच्या कल्याणासाठी असल्याचं मत व्यक्त केलं. नरेंद्र मोदी म्हणाले, “या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे गरिबांचं कल्याण. प्रत्येक गरिबाकडे पक्कं घरं हवं, नळातून पाणी यावं, घरी शौचालय असावं, गॅसची सुविधा असावी. या सर्व गोष्टींवर अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आलंय. याशिवाय आधुनिक इंटरनेट सुविधेवरही तेवढाच भर देण्यात आला. भारताचा डोंगराळ भाग, हिमालयाचा परिसर या ठिकाणी जीवन सहज व्हावं आणि तिथून स्थलांतर होऊ नये म्हणून नव्या घोषणा करण्यात आल्या.
राहुल गांधींना बजेट समजत
नाही का? सोशल मीडियावर प्रश्न
बजेटचं वाचन सुरू असताना राहुल गांधी यांनी आपल्या डोक्याला हात लावला. हे बजेट त्यांना समजत नाही म्हणून त्यांनी डोक्याला हात लावला की आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर होता म्हणून त्यांनी डोक्याला हात लावला असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर युजर्सकडून विचारले जात आहेत. राहुल गांधींनी डोक्याला हात मारल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर अनेक मीम्स देखील तयार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांच्या या फोटोमुळे राहुल गांधी चांगलेच ट्रोल झाले आहेत.
आमदार नितेश राणे यांचा
जामीन अर्ज फेटाळला
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयासमोर राणे समर्थकांची मोठी गर्दी जमली. त्यांच्याबरोबर माजी खासदार निलेश राणे हे ही उपस्थित आहेत. न्यायलायाने निर्णय जाहीर केल्यानंतर निलेश राणे समर्थकांसह तिथे पोहचले.
हिंदुस्थानी भाऊला अटक
चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
विद्यार्थी आंदोलन चिथवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला म्हणजे विकास पाठकला आज सकाळी अटक करण्यात आलं. हिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ झाली आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत हिंदुस्थानी भाऊच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. वांद्रे कोर्टानं ही सुनावणी सुनावली आहे. विद्यार्थ्यांना भडकावल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला कोठडी सुनावण्यात आली आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत तपासात काय सापडतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
अमेरिकेत विजेच्या कडकडाटनं
केला नवा विश्वविक्रम प्रस्थापित
अमेरिकेत अवकाशातून होणाऱ्या विजेच्या कडकडाटनं नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात लांब वीज पडल्याची नोंद करण्यात आली आहे. हे अंतर सुमारे ७७० किमीचं होतं. म्हणजेच लंडनपासून जर्मनीच्या हॅम्बर्गपर्यंत किंवा न्यूयॉर्क ते कोलंबस ओहिओ इतकं असेल. अमेरिकेच्या हवामान खात्याचं म्हणणं आहे की, यापूर्वी २९ एप्रिल २०२० रोजी मिसिसिपी, लुईझियाना आणि टेक्सासमध्ये वीज ७६८ किलोमीटरपर्यंत कडाडली होती. तेव्हाही एक नवा विक्रमही झाला होता.
SD social media
9850 60 35 90