1 फेब्रुवारीपासून बँकांसंबंधीत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. तुम्ही देखील बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी या बदलांबद्दल जाणून घेणं महत्त्वाचे आहे. चेक पेमेंट, एटीएम, गॅस सिलिंडरसह अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
पंजाब नॅशनल बँक १ फेब्रुवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करणार आहे. देशभरात एटीएम (Bank ATM) फसवणूक रोखण्यासाठी बँकेने काही खास नियम केले आहेत. 1 फेब्रुवारीपासून PNB ग्राहक नॉन-ईएमव्ही (EMV) एटीएम मशीनमधून पैसे काढू शकणार नाहीत.
बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) खाते असलेल्या ग्राहकांसाठी उद्यापासून मोठा बदल होणार आहे. बँक 1 फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलणार आहे. 1 तारखेपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन आवश्यक असेल. कन्फर्मेशन नसेल तर चेक परत केला जाईल.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी १ तारखेपासून ऑनलाइन व्यवहार करणे महाग होणार आहे. SBI च्या IMPS व्यवहारांमध्ये 2 ते 5 लाखांचा स्लॅब जोडला जाईल, ज्यासाठी तुमच्याकडून प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये अधिक GST आकारला जाईल.
याशिवाय 1 फेब्रुवारीला गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी सर्व शहरांतील गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले जातील. देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.