कोरोना विषाणू संसर्गामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव देखील बंद ठेवण्यात आली होती. कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आल्यानंतर 24 मे पासून बाजार समित्या सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचं पालनं करत बाजार समित्या सुरु ठेवण्यास परवागनी देण्यात आहे. सध्या कांदा लिलाव पूर्ववत होत आहेत. कांद्याला 2045 इतका भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं.
नाशकात 12 दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलावास सुरुवात झाली. कांद्याला 2045 इतका भाव मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. कांदा लिलाव व्हावा म्हणून शेतकरी बाजार समित्यांमध्ये माल घेऊन येत असल्याचं चित्र आहे.
नाशिकमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंध आता काही अंशी शिथिलता आल्यानंतर नाशिककर शहरातील कोरोना संपला, अशा अविर्भावात वावरतात की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिकच्या बाजार समिती बाहेर मध्यरात्रीच्या सुमारास हजारोंच्या संख्येने शेतकरी, भाजीपाला विक्रेते व नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतांना दिसत आहेत. ना मास्क,ना सोशल डिस्टनसिंग यामुळे याठिकाणी कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली होत असताना आता प्रशासन काय कारवाई करणार याकडेच साऱ्यांचं लक्ष आहे.
बाजार समितीमध्ये कांदा लिलाव हे बंद होते व ते सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण बघायला मिळाले. लिलावला येताना शेतकऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून येणे तसेच वाहन नोंदणी करणे बंधनकारक केली आहे. त्यानंतर बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासह प्रवेश दिला जाणार आहे,अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली होती.