शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर सुरू करण्याचे निश्चित झाले आहे. हा निर्णय वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या झुम मिटींगमध्ये घेण्यात आला. धाराशिव साखर कारखाना हा ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट राबवणारा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे,अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिली.
सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा फार मोठा जाणवत आहे. बैठकी वेळी व्हीएसआयकडून तातडीच्या उपाययोजना सांगण्यात आल्या. कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत. अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्युलर सिव्ह’ वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याचा तपशील चेअरमन अभिजीत पाटील यांनी पटवून सांगितले आणि या मिटींगमध्ये तत्काळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
धाराशिव साखर कारखाना प्रति दिन 16 ते 20 टन ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले. वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यरत करीत आहेत. धाराशिव साखर कारखान्यास ऑक्सिजन निर्मिती तयारीस लागणा-या परवानगी मंत्री जयंत पाटील यांनी त्वरित देण्याचे सांगून लवकर पायलट प्रकल्प कार्यरत करावा असे सांगितले. वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरींगच्या टेक्निकलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास उस्मानाबाद जिल्ह्याला ऑक्सिजन बाबतीत दिलासा मिळणार असून ऑक्सिजनचा तुटवडा काही प्रमाणात कमी होणार आहे.
वाढत्या ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन या ऑक्सिजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यरत करीत आहे. धाराशिव साखर कारखान्यास ऑक्सिजन निर्मिती तयारीस लागणा-या परवानगी त्वरित देण्यात येतील असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रकल्प त्वरीत कार्यरत करावा,असे सांगितल्याची माहिती अभिजीत पाटील यांनी दिली. वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरींगच्या टेक्निकलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करण्यात येणार आहे.