नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढू शकते

नव्या वर्षात मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी देऊ शकते. मोदी सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) मध्ये आणखी एक वाढ करू शकते. एचआरए वाढवण्याची घोषणाही सरकार लवकरच करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील वर्षी जानेवारी 2022 पासून ही वाढ लागू केली जाऊ शकते. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) 31 टक्के करण्यात आला होता.

कर्मचाऱ्यांनी मोदी सरकारला प्रस्ताव पाठवला
सरकार एचआरए वाढवण्याची चर्चा करत आहे. वित्त मंत्रालयाने यासंदर्भात 11.56 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) लागू करण्याच्या मागणीवर विचार सुरू केलाय. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021 पासून एचआरए मिळेल. या कर्मचाऱ्यांना एचआरए मिळताच त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. इंडियन रेल्वे टेक्निकल पर्यवेक्षक संघटना (IRTSA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन (NFIR) यांनी 1 जानेवारी 2021 पासून HRA लागू करण्याची मागणी केली आहे.

घरभाडे भत्ता (HRA) ची श्रेणी X, Y आणि Z वर्ग शहरांनुसार आहे. म्हणजेच X श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दरमहा 5400 रुपयांपेक्षा जास्त एचआरए मिळणार आहे. यानंतर Y वर्गाच्या व्यक्तीला दरमहा 3600 रुपये आणि नंतर Z वर्गाच्या व्यक्तीला प्रति महिना 1800 रुपये HRA मिळेल. 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे X श्रेणीत येतात. या शहरांमधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27 टक्के एचआरए मिळेल. Y श्रेणीतील शहरांमध्ये 18 टक्के आणि Z श्रेणीत 9 टक्के असेल.

ते एका उदाहरणाने समजून घेता येईल. जर एखाद्याचा मूळ पगार 30,000 रुपये असेल, तर त्याला दरमहा सुमारे 5400 ते 8100 रुपयांचा लाभ मिळेल. ताज्या अपडेटनुसार, घरभाडे भत्ता दरमहा किमान 5400 रुपये निश्चित करण्यात आलाय, जो यापेक्षा कमी असू शकत नाही. एचआरए हा पगाराचा केवळ एक भाग आहे, जो एखाद्या कंपनीकडून त्या शहरातील राहण्याचा खर्च लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना दिला जातो. कंपनी त्याची पगार रचना, पगाराची रक्कम आणि कर्मचारी ज्या शहरात राहतो, अशा पॅरामीटर्सच्या आधारावर HRA रक्कम अदा करायची ठरवते. शहर महाग असेल तर एचआरए जास्त असेल, शहर स्वस्त असेल तर एचआरए कमी असेल. HRA वाढवण्यामागील कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना खर्चात दिलासा देणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.