आजच्या दिवशी ३७० हटलं, राम मंदिराचं भूमिपूजन झालं आणि आता हॉकी टिमने इतिहास रचला – रवीशंकर प्रसाद
भारतीय हॉकी टीमनं टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये जर्मनीचा पराभव करून कांस्य पदकाची कमाई केली आहे. या विजयाबद्दल देशभरातून भारतीय हॉकी टीमचं कौतुक केलं जात आहे. सर्वच स्तरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना भारतीय जनता पक्षानं देखील हॉकी टीमचं कौतुक केलं आहे. भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपातर्फे हॉकी टीमचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी आजच्याच दिवशी झालेल्या कलम ३७० विषयीच्या निर्णयाचा आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाचा देखील उल्लेख केला.
राज्यात तृतीयपंथीयांची नोंदणी तातडीने सुरु करा , धनंजय मुंडे यांचे निर्देश
राज्यातील तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी महामंडळ स्थापन केले आहे. महामंडळाच्या माध्यमातून योजना राबविण्यासाठी तृतीयपंथीयांची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध व्हावी यासाठी या घटकांनी पुढे येऊन नोंदणी करावी. ही नोंदणी प्रक्रिया तृतीयपंथीयांच्या नोंदणीकृत संस्थांच्या मार्फत विभागीय स्तरावरून तातडीने सुरू करावी अशी सूचना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. तसेच ही प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी समाजकल्याण आयुक्त आणि संघटनांना दिल्या.
मी घटनेनुसारच काम करतो – राज्यपाल कोश्यारी
राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावरून राजकारण पेटलेलं असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे. मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्यपालांनी म्हटलं आहे.
सोन्याच्या दरात मोठी घसरण
तुम्ही सोने किंवा चांदी विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. जागतिक बाजारपेठेत झालेल्या घडामोडींमुळे देशातल्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती उतरल्या आहेत. दिल्लीत सोन्याचा भाव प्रतितोळा 312 रुपयांनी पडला तर चांदीच्या किंमतीत किलोमागे 1 हजार 37 रुपयांची घट झाली आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांनुसार जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दर पडल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे.
म्हाडाची लॉटरी १४ आॕक्टोबरला
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार 288 घरांसाठी म्हाडा लॉटरी काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली. गोरगरीब लोकांसाठी घरं उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. अर्ज भरायची रक्कम 5 हजार रुपये आहे. 14 ऑक्टोबर रोजी लॉटरी निघणार आहे. त्यासाठी येत्या 23 ऑगस्टपासून फॉर्म विक्री सुरू होणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
इतकंच नाही तर पुढील आठ दिवसात मुंबईतील घरांच्या लॉटरीची घोषणा केली जाणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
SD Social Media
9850 60 3590