औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील कच्च्या घरांचं, शेती पिकांचं तसेच फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पावसाने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी देखील शिरलं. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
जिल्ह्यातील पैठण, खुलताबाद, पाचोड परिसराला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. पळसवाडी, चित्तेपिंपळगाल, गल्लेबोरगाव, वैजापूर, मनोर येथेही जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यंदा जून महिन्याच्या अगोदर जरी पाऊस पडला असेल तरीही शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करावं, असा आवाहन कृषी अधिकारी हर्षदा जगताप यांनी केलंय.
जिल्ह्यातील पैठण आणि पाचोड परिसराला सर्वाधिक पावसाचा फटका बसला. या पावसात अनेक कच्च्या घरांचं नुकसान झालं. पावसाने नागरिकांच्या घरात पाणी देखील शिरलं. तर काहींच्या घरावरील पत्रे उडाले. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
शेतकऱ्यांचं या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांची पिकांचं या पावसात नुकसान झालं. तर या पावसाने फळ पिकांनाही मोठा फटका बसला. अनेक फळ पिकांच्या बागेमध्ये पाणी साचून राहिलं. त्यामुळे शेतकऱ्यांना फळपिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले.