बॉलीवूड मधून गायब झालेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आल्या ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले. पण काही काळानंतर त्या बॉलिवूडपासून पूर्णपणे गायब झाल्या. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर देखील अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या हॉटनेसमुळे शिल्पा संपूर्ण बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली होती. अभिनेत्रीच्या बोल्ड सीनवर बर्‍याच चर्चा होत. शिल्पाने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

सुरुवातीला शिल्पाला बॉलिवूडमध्ये एक ‘फ्लॉप’ अभिनेत्री म्हणून देखील पाहिले गेले होते. यामागचे कारण असे होते की, शिल्पाची एंट्री होताच तो चित्रपट बंद पडत असे. त्यानंतर रमेश सिप्पी यांनी अभिनेत्रीला आपल्या चित्रपटात संधी दिली, हा चित्रपट होता ‘भ्रष्टाचार’. या चित्रपटात तिला पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात शिल्पासह रजनीकांत, रेखा आणि मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते.

त्यानंतर शिल्पाचा ‘किशन कन्हैया’ हा चित्रपट 1990 मध्ये बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिच्या बोल्ड सीनमुळे ती खूप चर्चेत आली होती. या चित्रपटातील बोल्ड सीन त्या काळात खूप व्हायरल झाले होते. या चित्रपटात शिल्पासोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत होती. ज्यानंतर शिल्पाचे नशीब बदलले. त्या काळात तिने बॉलिवूडच्या बऱ्याच मोठ्या कलाकारांसोबत काम केले आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ‘जीवन की शतरंज’, ‘रंगबाज’, ‘अपने दम पर’, ‘खुदा गवाह’ या चित्रपटांमध्ये शिल्पा झळकली आहे.

पण काही दिवसानंतर शिल्पाचे करिअर फ्लॉप चित्रपटांकडे वळू लागले आणि तिने स्वत:ला चित्रपटांपासून दूर करण्याचा निर्णय घेतला. शिल्पा शेवट ‘गज गमिनी’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट एमएफ हुसेन यांनी बनवला होता. ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित देखील या चित्रपटात होती. पण हा चित्रपट बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला.

2000 मध्ये, अभिनेत्रीने यूके स्थित बँकर, अपरेश रणजितशी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्रीने लंडनमध्ये राहायला सुरुवात केली. शिल्पाला एक मुलगीही आहे. यूकेनंतर आता अभिनेत्री आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत दुबईमध्ये राहते. तिने 6 जानेवारी रोजी कोरोनाची लस देखील घेतली. कोरोनाची लस घेणारी ती बॉलिवूडची पहिली अभिनेत्री आहे .

आता शिल्पा शिरोडकरला दुबईचे प्रसिद्ध मॅगझिन ‘वंडर मॉम’ने तिला ‘कव्हर मॉम’ बनवले आहे. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.