अयोध्येतील प्रभू श्रीरामासाठी बनवलाय ११०० किलोचा दिवा
सध्या देशात राम मंदिराची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहे. यावेळी प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोद्धेत जोरदार तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर राम मंदिरातील आणि त्या संबंधीत फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रामललासाठी ११०० किलोचा दिवा बनवलेला दिसत आहे. हा खास दिवा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या दिव्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.१०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी देशात वाद सुरू होता, तो आता संपुष्टात आला असून राम मंदिराच्या उद्घाटनाने एक नवी सुरुवात दिसून येईल. या उद्घाटनासाठी अनेक जण उत्सूक आहेत. अनेक लोक त्या दिवशी अयोद्धेत आणि आपआपल्या घरी दिवे लावून दिवाळी साजरी करणार आहे. देशभरात अनेक ठिकाणी त्या दिवशी जल्लोष साजरा केला जाणार आहे. रामभक्त अनेक प्रकारे हा दिवस साजरा करताना दिसून येणार आहे. अशातच वडोदराचे रामभक्त अरविंदभाई पटेल यांनी रामललासाठी ११०० किलोचा दिवा बनवला आहे.
“निकालाबाबत सत्ताधाऱ्यांनी आधीच भाष्य केलं होतं, त्यामुळं..” शरद पवारांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. पण जो निकाल समोर आला आहे त्याचं भाष्य सत्ताधाऱ्यांनी आधीच केलं होतं. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात जावं लागेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकालानंतर मांडली. पवार म्हणाले, हा आश्चर्यकारक निकाल आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यासह त्यांना खात्री होती निकाल काय लागणार आहे, यावर त्यांनी भाष्यही केलं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरेंना आता सुप्रीम कोर्टात जावं लागेल. त्याच ठिकाणी त्यांना न्याय मिळण्याची खात्री आहे. आजच्या निकालात विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यामध्ये विधी मंडळ पक्षाला महत्व दिलं आहे.
अपात्रता प्रकरणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल स्पष्ट झालेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. यामध्ये शिंदेंची शिवसेना हाच खरा पक्ष असल्याचं स्पष्ट केलं. तसेच शिंदे गटाच्या १६ आमदारांना पात्र ठरवत ठाकरे गटाच्या १४ आमदारांनाही पात्र ठरवलं आहे. त्यामुळे अपात्रतेच्या कारवाईपासून सर्वच आमदार वाचले आहेत.आमदार अपात्रतेच्या निकालानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमचाही संघर्ष चालू आहे. त्यामुळं आमचं लक्ष फक्त अरक्षणाकडे आहे आणि शेवटी आम्ही 20 जानेवारीची तयारी करत आहोत. आम्हाला राजकारणाचा एवढा अभ्यास नाहीये, त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.
ठाकरे गटाचे १४ आमदारही पात्र, पण ‘पक्ष’ गेला…; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आज (बुधवार) मोठा निर्णय दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र केलं नाही. मात्र शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे.
राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचा व्हिप वैध ठरवला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला पण १४ आमदार राहीले आहेत. एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका राहुल नार्वेकर यांनी फेटाळल्या आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांचेही आमदार पात्र आहेत.
दरम्यान ठाकरे गटाने या निर्णयाला विरोध केला आहे. ठाकरे गट याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राम मंदिर सोहळ्यासाठी सोनिया गांधी जाणार की नाही? अखेर काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका
२२ जानेवारीला अयोध्यतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांनी या सर्व कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इव्हेंट ठरवलं आहे.
सुरु होण्याच्या आधीच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला ब्रेक? मणिपूर सरकारने परवानगी नाकारली
लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रे १४ जानेवारीला मणिपूरमधून सुरु होणार आहे. मात्र, सुरु होण्याआधीच यात्रा अचडणीत आली आहे. मणिपूर सरकारने भारत जोडो न्याय यात्रेसाठी मागण्यात आलेले सार्वजनिक मैदान नाकारले आहे.
मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के मेघचंद्रा यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आम्ही बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना भारत जोडो न्याय यात्रेसाठी जागेची मागणी केली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध हफ्ता कांगजेइबुंग मैदानात सभा घेण्यास परवानगी नाकारली आहे, असं मेघचंद्रा म्हणाले.
रिलायन्स, मारुती आणि टाटा समूहाने गुजरातमध्ये केल्या गुंतवणुकीच्या मोठ्या घोषणा
व्हायब्रंट गुजरात 2024 मध्ये भारत आणि परदेशातील मोठ्या कंपन्यांनी मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप, मारुती सुझुकी यांचा समावेश आहे. त्यांनी गुंतवणुकीसाठी केलेल्या घोषणांवर एक नजर टाकूया.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की रिलायन्स हजीरा येथे भारतातील पहिली आणि जागतिक दर्जाची कार्बन फायबर सुविधा उभारणार आहे. व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये बोलताना अंबानी म्हणाले की, रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील.
नौदलासाठी अदानींच्या कंपनीने बनवलं खास ड्रोन!
भारतीय नौदलाच्या ताफ्यात आता एक नवीन ड्रोन आलं आहे. दृष्टी 10 स्टारलाइनर असं या ड्रोनचं नाव आहे. नौदलाचे प्रमुख आर. हरी कुमार यांनी आज हैदराबादमध्ये याचं अनावरण केलं. या अनमॅन्ड एरिअल व्हीकलची (UAV) निर्मिती अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेस या कंपनीने केली आहे.या ड्रोनच्या फ्लॅग-ऑफ सोहळ्याला अॅडमिरल आर. हरी कुमार हे प्रमुख अतिथी होते. यावेळी नौसेनेचे 75 सैनिक देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतीय नौदलाचा पुढील रोडमॅप कसा असेल याचा उल्लेख केला. संरक्षणाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर होत आहे. यासाठी अदानी ग्रुपचेही योगदान असल्याचं त्यांनी म्हटलं.
SD Social Media
9850603590