मोदी सरकार लक्षद्वीपमध्ये बांधणार नवीन विमानतळ; अरबी समुद्रात भारताचा दबदबा वाढणार
भारत आणि मालदीवमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादात आता भारत सरकार मिनिकॉय बेटांवर नवीन विमानतळ बांधणार आहे. येथून लढाऊ विमाने, लष्करी विमाने आणि व्यावसायिक विमाने चालवता येतील अशी योजना आहे. त्यामुळे भारताची लष्करी ताकद वाढेल.याशिवाय नागरी विमानेही येथे ये-जा करू शकतील. सध्या लक्षद्वीप आजही येथे एकच हवाई पट्टी आहे. येथे सर्व प्रकारची विमाने उतरू शकत नाहीत.
गॅब्रिएल अटल ठरले फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले गे पंतप्रधान
फ्रान्सचे अध्यक्ष इम्युनियल मॅक्रोन यांनी ३४ वर्षीय गॅब्रियल अटल यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. गॅब्रियल अटल हे मॅक्रोन यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. आता त्यांची वर्णी पंतप्रधान म्हणून लागली आहे. ओपीनियन पोलमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इम्युनियल मॅक्रोन यांची यावेळची निवडणूक जिंकणे कठीण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते मरिन ले पेन यांचा पक्ष आठ ते दहा टक्के अधिक मतदान मिळवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मॅक्रोन मोठे निर्णय घेताना दिसत आहेत.
उस्ताद राशिद खान यांचे वयाच्या 55 व्या वर्षी निधन
संगीत सम्राट म्हणून ओळखले जाणारे उस्ताद राशिद खान यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले आहे. उस्ताद राशिद खान हे काही काळापासून कर्करोगाची झुंजत होते. त्यांच्यावर कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे. उस्ताद राशिद खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदायू मध्ये झाला होता. सुरुवातीला त्यांनी आपले आजोबा उस्ताद निस्सार हुसैन खान (१९०९-१९९३) यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे ते पुतणे होते. गुलाम मुस्तफा खान यांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना मुंबईत मध्ये संगीत शिक्षण देण्यास सुरुवात केली होती.
आमदार अपात्रतेवर उद्या निकाल! नार्वेकर अन् CM शिंदेंची झाली भेट; ठाकरेंची थेट सुप्रीम कोर्टात धाव
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणाचा अंतिम निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. पण या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांनी हे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, अपात्रतेची टांगती तलवार असलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी निकाल देणारे अध्यक्ष नार्वेकर यांची निकालापूर्वीच तीन दिवस आधी भेट घेतली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. याद्वारे ते निकालावर प्रभाव टाकू शकतात, असं ठाकरेंनी दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे.
NEET PG 2024 परीक्षा अखेर पुढे ढकलली; NBEची अधिकृत घोषणा
NEET PG 2024 Exam परीक्षेची तारीख बदलली असून ही परीक्षा आता ७ जुलै रोजी होणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं (NBE) यासंदर्भात आज अर्थात ९ जानेवारी रोजी नोटीस काढली आहे. उमेदवारांना यासंदर्भातील सविस्तर नोटीस NBEच्या वेबसाईटवर पाहता येईल. NEET PG 2024 Exam परीक्षा पुढे ढकलली जाणार असल्याची अफवा पूर्वी पसरली होती. पण आता NBEनं अधिकृतरित्या परीक्ष पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी परीक्षा ३ मार्च २०२४ रोजी घेण्यात येणार होती. पण आता नवी तारीख ७ जुलै २०२४ अशी निश्चित करण्यात आली आहे. लवकरच याच्या नोंदणीची प्रक्रिया NBE कडून सुरु करण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर फरार झाले बिल्किस बानो प्रकरणातील ९ दोषी; घराबाहेर पोलीस तैनात
देशभरात चर्चेत आलेल्या बिल्कीस बानो प्रकरणातील दोषीची शिक्षा गुजरात सरकारने रद्द केली, त्यासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल देत गुजरात सरकारचा निर्णय रद्द केला. त्यानंतर सर्व दोषी ११ जणांना पुन्हा एकदा ताब्यात घेण्याचे निर्देश काल सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर आता बिल्किस बानो प्रकरणातील बहुतांश गुन्हेगारांचा सध्या पत्ता नाही. 11 पैकी किमान 9 दोषी सध्या आपापल्या घरी नाहीत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांची माहिती नाही.
सोमवारी (8 जानेवारी, 2024), सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणाचा निर्णय दिल्यानंतर काही तासांनंतर, गुजरातमधील दाहोदमधील दोषींच्या (राधिकापूर आणि सिंगवाड) गावात माध्यमे पोहोचली, तेव्हा त्यांना त्यांच्या दाराला कुलूप लावले असल्याचे दिसून आले. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
असमाधानकारक! केप टाऊनच्या खेळपट्टीवर अखेर आयसीसीने ओढले ताशेरे
आयसीसीने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केप टाऊनमधील न्यूलँड्समध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीवर ताशेरे ओढले आहेत. आयसीसीने या खेळपट्टीला असमाधानकारक असा शेरा दिला आहे. या सामन्यात पहिल्या दिवशीच 23 विकेट्स पडल्या होत्या. तर संपूर्ण कसोटी सामना दीड दिवसात संपुष्टात आला होता.
रिलायन्सच्या Campa ने जिंकली बीसीसीआयची स्पॉन्सरशिप; कोका-कोला, पेप्सिकोची मक्तेदारी संपणार?
कोको – कोला आणि पॅप्सिकोला शह देण्यासाठी भारतीय बाजारात एक नवीन सॉफ्ट ड्रिंक येणार आहे. रिलायन्स रिटेल व्हेंच्युर्सची शाखा एफएमसीजी कॅम्पा हे सॉफ्ट ड्रिंक भारतीय बाजारात उतरवणार आहे. कॅम्पाने नुकतेच बीसीसीआयचा केंद्रीय स्पॉन्सरशिप जिंकली याबाबतेच अधिकृत ट्विट बीसीसीआयने प्रसिद्ध केलं आहे.
कॅम्पा सोबतच अॕटमबर्ग देखील बीसीसीआयचा भारतात होणाऱ्या सामन्यांसाठीचा स्पॉन्सर असणार आहे. ही डील 2024 ते 2026 अशा दोन वर्षासाठी असणार आहे. अॕटमबर्ग टेक्नॉलॉजी ही कंपनी होम अप्लायन्सेस तयार करणारी कंपनी असून तिने गेल्या काही वर्षात भारतात चांगला जम बसवला आहे.
राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ यांचे दोन महत्त्वाचे निर्णय
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रासाठी देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होणार आहेत. तसंच, हजारो अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने उत्तर प्रदेशातील नागरिकांची आणि विशेषतः विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरता योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी मंगळवारी राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली. शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याबरोबरच उद्घाटन समारंभाच्या दिवशी राज्यभरात मद्यविक्री होणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जाऊ बाई गावात : आजारपणानंतर सागर कारंडेचं कमबॅक! पोस्टमन काकांना पाहून स्पर्धक भावुक
हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शहरात राहिलेल्या मुली गावाकडील संस्कृतीला आपलंस कसं करणार? यावर या कार्यक्रमाची थीम आधारित आहे. ‘जाऊ बाई गावात’मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नेहमीच विविध ट्विस्ट येत असतात. लवकरच या शोच्या माध्यमातून एका लोकप्रिय अभिनेत्याचं कमबॅक होणार आहे.‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडे घराघरांत लोकप्रिय झाला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आजारपणामुळे मनोरंजन विश्वापासून दूर होता. तपासणीमध्ये सागरला अॅसिडिटी झाल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून ‘चला हवा येऊ द्या’चे चाहते सागर कारंडेला पोस्टमन काकांच्या रुपात शोमध्ये परत बोलवा अशी मागणी करत होते. परंतु, प्रेक्षकांच्या लाडक्या पोस्टमन काकांनी ‘जाऊ बाई गावात’च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.
SD Social Media
9850603590