नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणाऱ्या बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींच्या अंहिसावादी विचारांनी लक्ष केलंय. महात्मा गांधीजीचा अंहिंसावाद आणि महात्मा गांधीजीचा हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी हुतात्मा राजगुरुंच्या स्मुर्तीस्थळावर केलं. तसंच, महात्मा गांधींचा म्हाताऱ्या म्हणून उल्लेखही त्यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.
1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अंहिसेच्या मार्गाने नाही तर 1942 क्रांतीकारक चळवळ उभी राहिली त्या चळवळीचा बोध इंग्रजांनी घेतला. कुठतरी सांगितले जाते की देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल, मिली हमें आजादी बिना खडग बिना ढाल’ असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान असल्याची टीका कराडकरांनी केली.
क्रांतीकारक भगतसिंगाच्या मनात महात्मा गाधींची छाप होती. मात्र महात्मा गांधीजीचा अंहिसावाद भगतसिंगाच्या मनात ठसावला होता. आपल्या देशाला स्वातंत्र अंहिसक मार्गाने मिळवायचे हा भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. जालियनवाला वाला हत्याकांडाला गाधींनी समर्थन द्यायला नकार दिल्यानंतर भगतसिंग आणि गांधीजी यांच्यात नाराजी उभी राहिली, असंही कराडकर म्हणाले.
महात्मा गांधीजींना म्हाताऱ्याची उपमा देत त्यांच्या मार्गाने जाण्याचे कारण नाही. त्यानंतर भगतसिंग क्रांतीकारक बनले. या दरम्यान लोकमान्य टिळकांची आठवण करुन देत या म्हाताऱ्याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवायचा विचार केला तर 1 हजार वर्ष लागली असती, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं