इलेक्ट्रिक वाहनं बाजारात इलेक्ट्रिक कार BMW iX लॉन्च करणार

भारतासह जगभरातील सर्वच प्रमुख वाहन कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहेत. बहुतांश कंपन्यांनी आपापली इलेक्ट्रिक वाहनं बाजारात दाखल केली आहेत. यातच आता लक्झरी कारमेकर कंपनी बीएमडब्ल्यूची भर पडणार आहे. कंपनी आपली इलेक्ट्रिक कार BMW iX लॉन्च करणार आहे. 11 डिसेंबर रोजी लॉन्च होणारी BMW iX CBU मार्गाने भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होईल. BMW कंपनी iX सह भारतात प्रीमियम इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. (All electric BMW iX India launch on December 11)

BMW iX ऑल-न्यू अॅल्युमिनियम स्पेसफ्रेमवर आधारित आहे आणि आकाराने BMW X5 सारखीच आहे. कार BMW च्या पाचव्या जनरेशनमधील ऑल-इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मचा वापर करते, ज्यामध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत. BMW iX इलेक्ट्रिक कार भारतातील Mercedes-Benz EQC आणि Audi e-tron सारख्या SUV ला टक्कर देईल.

BMW iX मध्ये फास्ट चार्जिंग सिस्टमचा पर्याय मिळेल, जी 195kW पर्यंत DC फास्ट चार्जिंग देते. याच्या मदतीने xDrive 50 व्हेरियंटची बॅटरी केवळ 35 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. दुसरीकडे, DC चार्जर वापरून BMW iX xDrive 40 10 टक्क्यांवरून 80 टक्के चार्ज करण्यासाठी फक्त 31 मिनिटे लागतात.

BMW iX xDrive 40 व्हेरियंटमध्ये 71 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे ही बॅटरी सिंगल चार्जवर 414 किमी रेंज देते. ड्युअल मोटर्स 322 BHP आणि 630 Nm आउटपुट देते. xDrive 50 व्हेरियंटमध्ये 105.2 kWh बॅटरी पॅक वापरला जातो, जो 611 किमीची रेंज देतो. हे व्हेरिएंट 516 BHP पॉवर आणि 765 Nm टॉर्क जनरेट करते आणि 4.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकतं.

BMW IX सोबत 11kW AC वॉलबॉक्स फास्ट चार्जर देखील मिळतो. याद्वारे, xDrive 50 व्हेरियंटची बॅटरी 11 तासांपेक्षा कमी कालावधीत 100 टक्के चार्ज केली जाऊ शकते, तर xDrive 40 व्हेरियंटला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 7.5 तास लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.