अभिनेत्री विद्या बालनची सुरुवात झाली होती मालिकेपासून

विद्या बालनने तिच्या करिअरची सुरुवात एका टीव्ही सीरियलने केली होती. 1995ची ही मालिका मालिका आजही सुपरहिट आहे. लोकांना आजही हा शो खूप आवडतो.

‘डर्टी पिक्चर’, ‘शकुंतला देवी’, ‘कहाणी’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हीने आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे. तिची शैली प्रत्येक वेळी अद्वितीय असते. तिचे प्रत्येक नवीन पात्र देखील खूप वेगळे असते, ज्यामुळे तिचे खूप कौतुक केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, विद्या बालनने तिच्या करिअरची सुरुवात एका टीव्ही सीरियलने केली होती. 1995ची ही मालिका मालिका आजही सुपरहिट आहे. लोकांना आजही हा शो खूप आवडतो.

विद्या बालनने वयाच्या 16व्या वर्षी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात ‘हम पांच’ या टीव्ही मालिकेतून केली होती. हा शो एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांनी तयार केला होता. या शोने बरीच लोकप्रियता मिळविली. या शोमधून विद्याने करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली.

‘हम पांच’ मालिकेत मध्यमवर्गीय माणसाची कहाणी दाखवण्यात आली होती. ‘आनंद माथूर’ असे या पात्राचे नाव होते. तो एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करतो आणि त्याला पाच मुली आहेत, ज्या त्यांच्या वडिलांच्या नकळत अनेक कारनामे करत असतात. आनंदच्या तीन मुली त्यांची पहिली पत्नीच्या असून, दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे, पण एका फोटोद्वारे ती पती आनंदशी बोलते.

आनंद माथूरच्या पाच मुलींची पात्रे स्वतंत्रपणे दाखवली आहेत. यातील कुणी गुंडांशी भांडण करतात, तर कुणाला शाहरुख खानशी लग्न करायचे आहे. प्रत्येक भागात त्याच्या मुली आनंद माथुरसाठी एक नवीन भानगड घेऊन येतात. विद्या बालनने यात राधिकाची भूमिका केली होती, ती आनंद माथुरची दुसरी मुलगी होती. यापूर्वी हे पात्र अमिता नांगियाने साकारले होते, नंतर तिची जागा विद्या बालनने घेतली. या भूमिकेत विद्या बालन लांब केस आणि मोठा चष्मा परिधान करताना दिसली. जेव्हा विद्याने ही भूमिका केली होती, तेव्हा तिचे वय जास्त नव्हते. तिने अवघ्या 16व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती. या पत्राने विद्याला ओळख मिळवून दिली.

विद्या बालनने टीव्ही मालिकांनंतर तमिळ-तेलगू चित्रपटांमध्येही काम केले होते. ‘भाला ठेको’ या बंगाली चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिने ‘परिणीता’मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात ती सैफ अली खानसोबत दिसली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.