असे अनेक व्यक्तीमत्व आहेत, ज्यांच्या मोलाच्या कामगिरीमुळे देशाला स्वातंत्र मिळालं. पण त्यांच्यामधील काहींनी अद्यापही त्यांचा हक्क मिळालेला नाही. अशाचं व्यक्तीमत्त्वांपैकी एक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर… सावरकरांनी देशासाठी केलेलं कार्य फार मोलाचं आहे.. अशी प्रतिक्रिया अभिनेता रणदीप हुड्डाने दिली आहे.
रणदीप हुड्डाच्या वक्तव्यामागे देखील एक कारण आहे, रणदीप लवकरचं दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमात सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. रणदीपने सोशल मीडियावर सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित केला. सावरकरांच्या भूमिकेतील फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, ‘काही गोष्टी सांगितल्या जातात, तर काही जगता येतात…. ‘ सध्या रणदीपची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, सरादर भगतसिंग यांच्या हौतात्म्यदिनानिमित्त स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या बायोपिकमध्ये स्वातंत्र्य वीर सावरकरमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत तर निर्माते आनंद पंडित आणि संदीप सिंग आहेत. त्यामुळे सिनेमा कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं नाही.