प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचं निधन

प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांचं निधन झालं आहे. एक विचारी , साक्षेपी आणि संवेदनशील लेखक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सगळीकडेच शोककळा पसरली आहे.

जयंत पवार हे मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी रचलेल्या फिनिक्सचाय राखेतून उथला मोर या कथासंग्रहासाठी 2012 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.

2014 सालच्या जानेवारी महिन्यात 10 ते 12 या तारखांना महाड येथे झालेल्या 15व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते.

‘प्रयोग मालाड’ या नाट्यसंस्थेने 13-14 ऑक्टोबर 2018 या दिवसांत ‘लेखक एक, नाट्यछटा अनेक’ या नावाखाली एकांकिका स्पर्धां आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये जयंत पवार यांच्या 14 एकांकिकांमध्ये आपआपसात सामना झाला. हा कार्यक्रम मुंबई-बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचे मिनी थिएटर येथे होता. अशा स्पर्धांचे हे पाचवे वर्ष होते.

  • काय डेंजर वारा सुटलाय
  • फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
  • दरवेशी (एकांकिका)
  • शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक)
  • माझे घर
  • बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक)
  • वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)
  • होड्या (एकांकिका)
  • अधांतर
  • टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)
  • पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
  • वंश

त्यांनी लिहिलेली जबरदस्त नाटक आणि जयंत पवार हे नेहमीच सगळ्यांच्या मनात अमर राहतील. त्यांची कला हे कायम लोकांच्या मनात जिवंत राहिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.