महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या आणि दिल्लीपर्यंतही आपल्या कर्तृत्त्वानं शत्रूला थरथर कापायला भाग पाडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया किती थोर हे सानथोरांपासून सर्वांनाच ज्ञात. महाराजांची कारकिर्द ही प्रत्येकाला हेवा वाटेल आणि उर अभिमानानं भरुन येईल अशी. अशाच या कारकिर्दीतील, जीवनप्रवासातील एक दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.
याच खास दिवसाचं औचित्य साधत सुमारे 350 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘सुवर्ण होनांनी’ अभिषेक करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘होन’ सुपूर्द होणं हा एक सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 वा राज्याभिषेक सोहळा (आज) रविवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मागील वर्षी इथं विशेष परवानगी घेण्यात आली होती. यंदा देखील हा सोहळा अवघ्या काही मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितच साजरा करण्यात येणार असून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार होणारे सर्व कार्यक्रम होणार आहेत. तर, शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करीत कोरोनाच्या महामारीमुळे शिवप्रेमींना घरूनच शिवराज्याभिषेक साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी, जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं तयार केलं स्वराज्य दरम्यान , या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सुमारे 350 वर्षांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘सुवर्ण होनांनी’ अभिषेक करण्यात येणार आहे. तर यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज असलेले खासदार संभाजीराजे भोसले यांना ‘होन’ सुपूर्द करण्यात येणार असल्याने हा आपल्यासाठी आणि राज्यासाठी एक सुवर्ण क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.