आयकर विभागाने हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर छापेमारी केलीय. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका अलमारीत तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात USA, यूरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने 6 राज्यातील जवळपास 50 ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे.
आयकर विभागाच्या छाप्यावेळी खात्यांची पुस्तकं आणि रोख रक्कम मिळून आलीय. डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे या छापेमारीच जप्त करण्यात आली आहेत. या छापेमारीवेळी अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
त्याचबरोबर, जमीन खरेदीसाठी पैसे भरल्याचा पुरावाही सापडला आहे. त्यासह इतर अनेक कायदेशीर समस्या देखील ओळखण्यात आल्या आहेत. त्यात कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या खाली खरेदी केलेली जमीन, याचा समावेश आहे. अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान अनेक बँक लॉकर सापडले आहेत, त्यापैकी 16 लॉकर चालवले जात आहेत.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, हैदराबाद येथील एका अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनीवर 6 ऑक्टोबर रोजी छापेमारी करण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
घरात सोनं साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कायदेशीर मार्गाने सोनं खरेदी केलं असेल आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर घरात कितीही सोनं साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT) माहितीनुसार, तुम्ही घरी सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकता. मात्र, आयकर विभागाकडून घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याची तपासणी होऊ शकते. तुमच्या घरात 50 लाख रुपयापेक्षा जास्त किंमतीचे दागिने असतील तर इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ते नमूद करावे लागते.