सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स (CG Power & Industrial Solutions) कंपनीने शेअर गुंतवणूकदारांना भरघोस उत्पन्न मिळवून दिले आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या 12 महिन्यांत 1200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे या वर्षाच्या सुरूवातीपासूनच या शेअरमध्ये 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्सच्या शेअरमध्ये देशी-विदेशी गुंतवणूकदारांसोबतच प्रमोटर्सने भागीदारी वाढवली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्या गुंतवणूकदारांची संपत्ती 12 महिन्यांत वाढून 12.85 लाखांवर गेली आहे.
CG Power & Industrial Solutions कंपनीने देशासह परदेशी शेअरच्या गुंतवणूकदारांवर विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान मार्च तिमाहीत या कंपनीने घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदार (DII), विदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (FPI) गुंतवणूक वाढवली होती.
सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्सच्या शेअरमध्ये एका वर्षात 1200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 3 जून 2020 रोजी या शेअर्सची किंमत 6.30 रुपये होती. त्यात आता 1285 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या याची किंमत 87.30 रुपये इतकी आहे. या काळात सेन्सेक्समध्ये 53 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. या कंपनीची मार्केट कॅप 11,312.77 कोटी रुपये आहे.
काही दिवसांपूर्वी सीजी पॉवरच्या मालकीमध्ये बदल करण्यात आला होता. मुरुगप्पा ग्रुपने फसवणुकीनंतर ही कंपनी ट्यूब इन्व्हेस्टमेंटद्वारे ताब्यात घेतली होती. त्यानंतर शेअर बाजारातही याला प्रोत्साहन मिळाले होते.
दरम्यान डिसेंबर 2020 च्या तिमाहीत या कंपनीला 534.59 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तर डिसेंबर 2019 च्या तुलनेत हे प्रमाण 154.48 टक्के कमी आहे. याच काळात कंपनीने निव्वळ विक्री 819.52 कोटी रुपये केली होती.